Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Amulya fast patrol vessel: गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘अमूल्य’ या द्रुतगती गस्ती जहाजाचे शुक्रवारी (ता. १९) जलावतरण करण्यात आले.
Amulya fast patrol vessel
Amulya fast patrol vesselDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: येथील गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘अमूल्य’ या द्रुतगती गस्ती जहाजाचे शुक्रवारी (ता. १९) जलावतरण करण्यात आले.

याप्रसंगी संरक्षण मंत्रालयातील संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद तसेच भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक ज्योतिंद्र सिंह, गोवा शिपयार्डचे ऑपरेशनल संचालक रिअर अडमिरल (निवृत्त) नेल्सन डिसोझा, पद्मश्री लिबिया लोबो, गोवा शिपयार्डचे भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमिताभ यांनी वाढत्या धोक्यामुळे किनारपट्टींची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक गंभीर बनल्याने भारतीय तटरक्षक दलाची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारीची व्याप्तीही वाढत असल्याचे सांगितले. ११ हजार किलोमीटरहून अधिक व दोन दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या खास आर्थिक क्षेत्रामध्ये सुरक्षा, देखरेख व कायद्याची अमलबजावणी मजबूत करणे हे एक कठिण काम आहे. भारतीय तटरक्षक दल सागरी संरक्षणात देशाच्या पहिल्या क्रमाकाच्या संरक्षणात ठाम राहिले आहे, असे ते म्हणाले.

Amulya fast patrol vessel
Lotulim Shipyard Accident: नौका बांधताना उडाला आगीचा भडका, 5 जणांचा मृत्यू; ‘विजय मरीन’ च्या संचालकासह दोघे अटकेत

दरम्यान, नेल्सन डिसोझा यांनी गोवा शिपयार्डच्या चढत्या आलेखाचा आढावा घेतला. याप्रसंगी ज्योतिंद्र सिंह यांनी गोवा शिपयार्ड व भारतीय तटरक्ष दलाच्या उत्कृष्ट संबंधावर प्रकाशझोत टाकला.

Amulya fast patrol vessel
अभिमानास्पद! गोवा शिपयार्डमध्ये निर्मिती केलेल्या स्वदेशी बनावटीच्या अक्षय, अमूल्य जहाजांचे जलावतरण

आत्मनिर्भरतेचे प्रतीक

‘अमूल्य’ मुळे देखरेख व प्रतिसाद क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. ते म्हणाले, अत्यानुधिक प्रणाली व ६० टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी साम्रगीने सुसज्ज ‘अमूल्य’ ही ‘आत्मनिर्भर भारत’ च्या स्वप्नाचे एक तेजस्वी प्रतीक आहे. हे जहाज ऑपरेशनल उत्कृष्टता, आंतर यंत्रणा समन्वयात नवीन बेंचमार्क स्थापित करेल तसेच समुद्रात एक प्रभावी व अभिमानास्पद कार्य म्हणून कार्यरत राहिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com