Goa Crime News: बलात्‍कार प्रकरणातील अन्सारीला जामीन

Goa Crime News: कळंगुट येथील एका हॉdटेलमध्‍ये झालेल्‍या एका विदेशी महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित सहिमुद्दिन अन्सारी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News: कळंगुट येथील एका हॉdटेलमध्‍ये झालेल्‍या एका विदेशी महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित सहिमुद्दिन अन्सारी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला आहे.

Goa Crime News
Subhash Phaldesai: प्रत्‍येक ठिकाणी मंदिर उभारणे कठीण; एकच स्‍मारक बांधणार : सुभाष फळदेसाई

संशयित गेले दहा महिने कोठडीत आहे व त्याच्याविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा पोलिसांत नोंद नाही. पीडित महिलेने पोलिस व न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबान्यांमध्ये तफावत आहे. न्यायालयात आरोपपत्रही सादर झाले आहे. त्यामुळे या स्थितीत अटी घालून जामीन देणे योग्य ठरेल असे निरीक्षण जामीन देताना न्‍यायालयाने नोंदविले आहे.

संशयित अन्सारी याने वैयक्तिक 25 हजारांची हमी, तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करावा. खटल्यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत गोव्याबाहेर जाऊ नये. महिन्यातून एकदा शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत कळंगुट पोलिस स्थानकात हजेरी लावावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Goa Crime News
Art Field In Goa: कला क्षेत्रात युवकांना मोठ्या संधी

पीडित विदेशी महिला आपल्या कुटुंबासमवेत कळंगुट येथील हॉटेलात उतरली होती. कुटुंबीयासमवेत रात्रीचे जेवण घेताना मद्य घेतल्याने तिला तंद्री आली. त्यामुळे ती हॉटेलधील खोलीत एकटीच परतली. ती मद्यधुंद अवस्‍थेत असल्याचा फायदा घेऊन हॉटेलातीलच दोघा कर्मचाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. तिला सर्व काही समजत होते, पण प्रतिकार करण्याच्या स्थितीत ती नव्हती. त्यानंतर दोघेही कर्मचारी तेथून पसार झाले होते. घटनेची माहिती महिलेने कळंगुट पोलिस स्थानकात दिल्यावर अन्सारीसह दोघांना अटक केली होती.

न्‍यायालयाने नोंदविले असे निरीक्षण

पीडित महिलेने त्या कर्मचाऱ्यांची हॉटेलात ओळख पटवली होती व त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांसमोर व न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबान्या नोंद झाल्या होत्या. तिची व संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत पोलिसांना ठोस असे पुरावे सापडले नाहीत. ती मद्यधुंद अवस्‍थेत होती, त्‍यामुळे संशयितांची ओळख पटविण्‍याबाबत शंका आहे. ही ओळखपरेड पोलिसांनी न्यायालयात कायदेशीर प्रक्रियेनुसार केली नाही असे पोलिस तपासात आढळून येत असल्याचे न्यायालयाने जामीन देताना निष्कर्ष काढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com