Art Field In Goa: कला क्षेत्रात युवकांना मोठ्या संधी

Art Field In Goa: रितेश नाईकछ राजीव कलामंदिराची घुमट आरती स्पर्धा सुरू
Art Field In Goa
Art Field In GoaDainik Gomantak

Art Field In Goa: गोमंतकीय युवकांना कलेच्या क्षेत्रात मोठ्या संधी असून कलेचे रक्षण करण्याबरोबरच ही कला सर्वदूर पोचावी यासाठी युवकांकडून प्रयत्न व्हावेत, असे आवाहन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केले.

Art Field In Goa
Subhash Phaldesai: प्रत्‍येक ठिकाणी मंदिर उभारणे कठीण; एकच स्‍मारक बांधणार : सुभाष फळदेसाई

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धचे उद्घाटन काल रितेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कला मंदिराच्या सदस्य सचिव स्वाती दळवी तसेच सहायक सांस्कृतिक अधिकारी सुनील केरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी केले.

रितेश नाईक यांनी राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेत सहभागी सर्व कलाकारांचे अभिनंदन करताना त्यांना प्रोत्साहन दिले. अशा स्पर्धा उपक्रमांतून गोमंतकीय कलांचे योग्य सादरीकरण व्हायला हवे, ज्यातून या कला केवळ भारतातच नव्हे, तर सबंध जगात पोचणे शक्य होणार आहे.

घुमट आरती स्पर्धा किंवा फुगडी स्पर्धा या पूर्वी मर्यादित होत्या. पण आमदार व कृषिमंत्री रवी नाईक यांनी मुख्यमंत्री असताना कलेच्या क्षेत्रात योग्य न्याय देताना या स्पर्धांना राज्यपातळीवर आणले.

विविध स्पर्धाचे आयोजन

रितेश नाईक म्हणाले, राजीव गांधी कलामंदिरातर्फे विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करते, ज्यामुळे युवा कलाकारांना त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळणे शक्य होते.

सबंध गोव्यात तर घुमट, फुगडी व इतर पारंपरिक कलांच्या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने कलेच्या संवर्धनासाठी ही उत्तम बाब असून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने होताना युवा कलाकारांना संधी आहे, त्यासाठी त्यांनी भाग घ्यावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com