Goa Politics: "बापाला मुलांनी शिकवू नये!" मनोज परब यांच्या 'पोस्ट'ने पक्षात खळबळ; ‘आरजी’तील मतभेद चव्‍हाट्यावर!

Manoj Parab social Media Posts RGP: ‘रिव्‍हॉल्युशनरी गोवन्‍स’चे प्रमुख मनोज परब यांनी पक्षातील नेत्यांना उद्देशून समाज माध्‍यमांवर केलेल्या एकापाठोपाठ एक पोस्ट्समुळे पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाल्याची चिन्हे सार्वजनिकरित्या समोर आली.
Manoj Parab social Media Posts RGP
Manoj Parab social Media Posts RGPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘रिव्‍हॉल्युशनरी गोवन्‍स’चे प्रमुख मनोज परब यांनी पक्षातील नेत्यांना उद्देशून समाज माध्‍यमांवर केलेल्या एकापाठोपाठ एक पोस्ट्समुळे पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाल्याची चिन्हे सार्वजनिकरित्या समोर आली आहेत. या पोस्ट्सद्वारे ज्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे मानले जात आहे, त्यापैकी अनेक जण सांत आंद्रे मतदारसंघातील आमदार वीरेश बोरकर यांच्‍या निकटचे मानले जातात; त्‍यामुळे पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना आणखीच उधाण आले आहे.

जिल्‍हा पंचायत सदस्‍य तृप्‍ती बकाल यांच्‍यासह आदित्‍य देसाई, मयुरेश साळगावकर, लिसिओ रॉनकॉन, आश्‍‍लोन रॉड्रिग्‍स, तिओतोनियो कॉस्‍ता यांच्‍यावर परब यांनी सडकून टीका केली. ‘‘गेली तीन वर्षे मी नजर ठेवून होतो. ‘आरजीपी’त राजकारण कोण करीत आहे हे आता समोर आले आहे. लुटुपुटुची लढाई मला मान्‍य नाही, आता खेळूया या. बापाला मुलांनी शिकवू नये’’, अशा आशयाची पोस्‍ट समाज माध्यमांवर करीत परब यांनी तिखट प्रहार केले. मयुरेश साळगावकर यांना उद्देशून ‘‘तुझा बॉस असलेल्‍या आदित्‍य देसाईला सांग. तारीख आणि वेळ ठरवं.

मी थांबलो आहे.’’, तर आश्‍‍लोन रॉड्रिग्‍स आणि तिओतोनिया कॉस्‍ता यांना उद्देशून ‘‘बाहेर राहून तुम्‍ही चांगल्‍या पद्धतीने ‘ब्रेनवॉश’ करीत आहात’’, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

Manoj Parab social Media Posts RGP
Goa Politics: "नव्या चेहऱ्यांना संधी द्या" नितीन नबीन यांचा मुख्यमंत्री आणि दामू नाईकांना मोलाचा सल्ला; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज

वीरेशकडे स्‍पष्‍टीकरण मागितले : खोलकर

‘आरजीपी’चे खजिनदार अजय खोलकर म्हणाले, ‘‘आमदार वीरेश बोरकर आमच्‍यासोबतच आहेत; परंतु, पक्षातीलच काहीजण त्‍यांना फूस लावत आहेत. त्‍यांची नावे मनोज परब यांनी उघडपणे घेतली ते योग्‍यच झाले. याबाबत बोरकर यांच्‍याकडेही आम्‍ही स्‍पष्‍टीकरण मागितले असून, चर्चेची मागणीही केली आहे. पक्षातून चार-पाच जण गेले तरी फरक पडत नाही. याआधीही आम्‍ही काही जणांना काढून टाकले आहे’’, असे खोलकर यांनी स्‍पष्‍ट केले.

परब झाले भावनाविवश

एका पोस्‍टमध्‍ये मनोज परब यांनी ‘‘माझ्‍या आईच्‍या आणि आरजीपी कार्यकर्त्यांच्‍या प्रत्‍येक अश्रूचा हिशोब ठेवला जाईल.’’, असे म्‍हटले आहे. यातून पक्षांतर्गत सुरू असलेल्‍या बंडाळीमुळे ते भावनाविवश झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

Manoj Parab social Media Posts RGP
Goa Politics: आरजीपीमधील गटबाजी शिगेला! आल्मेदांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ; सांतआंद्रेत संतापाची लाट

तृप्‍ती बकाल ‘इनफ इज इनफ’!

सेंट लॉरेन्‍सच्‍या जिल्‍हा पंचायत सदस्‍य तृप्‍ती बकाल यांच्‍यावरही मनोज परब यांनी हल्लाबोल केला. ‘‘तृप्ती बकाल तुम्ही फुटबॉल या चिन्हावर जिंकला आहात, हे विसरू नका. तुम्‍हाला ‘इनफ इज इनफ’ हा थेट इशारा देतो. तुला चांगली तालीम देण्‍यात आली आहे.’’, असे त्‍यांनी पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे.

Manoj Parab social Media Posts RGP
Goa Politics: केजरीवालांबाबत भाजपकडून दिशाभूल! वाल्मिकी नाईक यांची आमदार साळकर यांच्‍यावर टीका

‘त्‍या’ पोस्‍टमुळे चर्चा

पक्ष व अध्‍यक्ष पदाबाबतही परब यांनी एक पोस्‍ट केली आहे. त्‍यात ‘‘पक्ष, अध्‍यक्षपद हवे होते, तर मला सांगायचे होते. ते असेच दिले असते. मी पक्षाला जीवन दिले आहे. मात्र, ही पोस्‍ट कुणाला उद्देशून केली याबाबत चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com