Goa Politics: "नव्या चेहऱ्यांना संधी द्या" नितीन नबीन यांचा मुख्यमंत्री आणि दामू नाईकांना मोलाचा सल्ला; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज

BJP Goa Election Strategy: आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्‍याचा सल्ला भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीन नबीन यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना दिल्‍याची माहिती सूत्रांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पक्ष संघटना अधिकाधिक बळकट करीत तसेच नव्‍या चेहऱ्यांना संधी देत आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्‍याचा सल्ला भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीन नबीन यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना दिल्‍याची माहिती सूत्रांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली. मुख्‍यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष नाईक बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आणि गुरुवारी त्‍यांनी तेथे नबीन यांची भेट घेतली. या बैठकीत फोंडा पोटनिवडणूक, मंत्रिमंडळातील रिक्त जागा, पक्ष संघटना आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.

या बैठकीत नबीन यांनी आम्‍हाला पक्ष संघटना अधिकाधिक बळकट करून तसेच केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून निवडणुकीस सामोरे जाण्‍याचा सल्ला दिला असल्‍याचे त्यांनी सांगितले. याबाबत प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता, ‘नितीन नबीन यांच्‍यासोबतच्‍या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रदेश भाजपच्‍या कामांची तसेच सरकारी योजनांच्‍या अंमलबजावणीसंदर्भातील माहिती त्‍यांनी आमच्‍याकडून जाणून घेतली.

bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
Goa Politics: आरजीपीमधील गटबाजी शिगेला! आल्मेदांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ; सांतआंद्रेत संतापाची लाट

‘भारत नेट’बाबत घेतली सिंधियांची भेट

दिल्ली भेटीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेत, त्‍यांच्‍यासोबत ‘भारत नेट’च्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. गोव्‍यात (Goa) डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करण्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे किती गरजेचे आहे, यावर त्‍यांनी भर दिला, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com