VIDEO: भक्तिरसात तल्लीन! कुशावती तिरी घुमले ‘आरती’चे स्वर; पहा अर्चकांचा लयबद्ध आविष्कार

Kushavati River Arati: ‘देवाचो पाणटो’ येथे उभारलेल्या भव्य व कलात्मक व्यासपीठावर हरिद्वारहून आलेल्या अर्चकांनी सादर केलेल्या ‘कुशावती आरती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Kushavati River Arati
Kushavati River AratiDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवानिमित्त कुशावती नदी आरती सोहळा उत्साहात पार पडला. गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ‘देवाचो पाणटो’ येथे उभारलेल्या भव्य व कलात्मक व्यासपीठावर हरिद्वारहून आलेल्या अर्चकांनी सादर केलेल्या ‘कुशावती आरती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच श्री नृसिंह गंगा आध्यात्म दीपक, हरिद्वारचे राजीवजी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा संस्थानतर्फे श्री दामोदराचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

Kushavati River Arati
Zambaulim Gulalotsav: ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय'! जांबावलीचा वैभवशाली गुलालोत्सव

प्रारंभी श्री दामोदराची पालखी वाजत-गाजत ‘देवाचो पाणटो’ येथे आली. त्यानंतर जगदंब ढोल पथकाच्या दमदार वादनाने वातावरण भारावून गेले. मंजुनाथ पै दुकळे यांच्या हस्ते कुशावती नदीचे विधिवत पूजन झाल्यानंतर नऊ अर्चकांनी धुपारती, वृक्षआरती आणि कर्पूर आरतीचा लयबद्ध आविष्कार सादर करत हजारो भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले.

Kushavati River Arati
Goa Winter Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल! राज्यपालांचे प्रतिपादन

यावेळी राजेश जांबावलीकर, दामोदर जांबावलीकर, राजेश मेस्ता, भावेश जांबावलीकर व सिद्धेश प्रभुदेसाई यांचा, तसेच देवस्थानचे सेवेकरी राजेश गावकर व सतीश देशभंडारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आरतीनंतर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचाही सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Ragada River Turbid Water
Mhadei River Archaeological Heritage
Bombay High Court Goa Bench Casino Order
Sanguem kushavati rock carvings
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com