Quepem Municipal Election: केपेत मतदार यादीत घोळ, व्हिजिनरीज फोरम संघटनेचा कोर्टात जाण्याचा इशारा

Quepem Municipal Election Voter List 2026: केपे पालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे आरोप केपे व्हिजिनरीज फोरम या संघटनेने केले आहेत.
Quepem Municipal Election
Quepem Municipal ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केपे पालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे आरोप केपे व्हिजिनरीज फोरम या संघटनेने केले आहेत. संघटनेने स्पष्ट केले की, हा घोळ दूर न केल्यास ही यादी न्यायालयात आव्हान दिली जाईल.

संघटनेच्या आरोपानुसार, सत्ताधारी गटाशी जवळ असलेल्या विद्यमान नगरसेवकांना फायदा मिळावा यासाठी निवडणूक यंत्रणेत मुद्दाम हेरफेर करून हा घोळ घालण्यात आला आहे.

Quepem Municipal Election
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

केपे काँग्रेस गटाचे अध्यक्ष अवधुत आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली मडगावात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी केपेचे नगरसेवक फिलू डिकॉस्ता, नगरसेविका ऑलिंदा लार्सेदा, तसेच क्लायव्ह कुलासो, श्रीपाद शेटकर, आणि विष्णू नाईक उपस्थित होते.

अवधुत आमोणकर यांनी सांगितले की, आगामी पालिका निवडणुकीत केपेतील काही नगरसेवकांवर नागरिकांची नाराजी असल्याने ते हरू शकतात. या नगरसेवकांना फायदा मिळावा म्हणून, एका प्रभागातील मते दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहेत. हा सर्व घोळ सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली केले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रक्रिया शंकास्पद...

क्लायव्ह कुलासो यांनी स्पष्ट केले की, केपेत मागील प्रमाणेच १३ प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभागांची संख्या बदलली नसताना, एका प्रभागातील सुमारे २०० ते २५० मते दुसऱ्या प्रभागात का हलवली गेली, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मागील निवडणुकीसाठी तयार आराखड्याची प्रत माहिती अधिकारानुसार मागितली असता अजूनही ती दिली गेली नाही, असेही ते म्हणाले.

Quepem Municipal Election
Goa Accident: दोनापावल-बांबोळी मार्गावर आलिशान भरधाव कारचा कहर; ठोकर दिल्याने तरुणी ठार, युवक गंभीर

श्रीपाद शेटकर म्हणाले की, प्रभागांची रचना गावातील रस्त्यांच्या दृष्टीने केली जाते. दोन प्रभाग रस्त्याने विभागले असल्यास, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे प्रभाग असतात. मात्र, सध्या तयार केलेल्या प्रभागरचनेत हे पालन केलेले नाही, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शंकास्पद वाटते, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com