Goa Politics: राज्य निवडणूक समितीची अद्याप स्थापना नाही; उमेदवारांबाबत गोपनियता

Goa Politics: भाजप-काँग्रेसची सावध खेळी : अजूनही पत्ते बंदच
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: लोकसभा निवडणुकीसाठी अनुकूल असे वातावरण तयार करण्यात भाजप राष्ट्रीय व राज्य पातळीवर मग्न असतानाच उमेदवारांच्या बाबतीत कमालीचे मौन पाळण्यात येत आहे. अद्याप राज्य निवडणूक समितीची स्थापना करण्‍यात आलेली नाही.

निवडणूक प्रभारी म्हणून आशिष सूद यांची नियुक्ती भाजप पक्षश्रेष्ठींनी केली असून ते अधूनमधून राज्यात येऊन संघटनात्मक पातळीवरील तयारीचा आढावा घेत आहेत. दरम्‍यान, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत.

काँग्रेस पक्षाने आपली राज्य निवडणूक समिती नेमली आहे. इच्छुकांकडून अर्जही मागविले होते. त्याआधी जिल्हा समित्यांकडून काही नावांचा विचार करण्यात आला होता. काही नावांची शिफारस करण्याचेही जिल्हा पातळीवर ठरवण्यात आले होते.

Goa Politics
Borim Fire Case: बोरीत कचऱ्याला लावली आग; शेड जळून खाक

गट समिती, जिल्हा समिती व प्रदेश समिती या टप्प्याने काँग्रेसमध्ये नावांची शिफारस होते व ही नावे निवडणूक समितीकडे जातात. त्यानंतर राज्यातून प्रत्येक मतदारसंघनिहाय तीन ते पाच इच्छुकांच्या नावांची शिफारस केंद्रीय पातळीवर केली जाते. हा टप्पा काँग्रेसने न करता इच्‍छुकांकडून अर्ज मागविले आणि ती नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत.

भाजपमध्ये पक्षासाठी उमेदवार कोण हा विषय तसा गौण आहे. पक्षाने गेल्या महिनाभरापासून ‘लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मतदान करा’ असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचविणे सुरू केले आहे. मतदानकेंद्र व त्यानंतर मंडळ पातळीवरील समित्यांच्या बैठका घेत भाजपने प्रचाराच्या कामाला गती दिलीय. तसेच दक्षिण गोव्यावर विशेष लक्ष दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे गेले वर्षभर संघटनात्मक कामांचा आढावा घेत आहेत.

Goa Politics
Goa Politics: संख्‍येने कमी असूनही विरोधक सरकारला भारी!

उत्तरेत दोन तर दक्षिणेत चार नावे अधिक चर्चेत

उत्तर गोव्यातून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी दिली जाईल असे भाजपकडून ठामपणे सांगण्यात येत नाही. नाईक हेसुद्धा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे छातीठोकपणे सांगत नाहीत. नाईक यांना नाकारल्‍यास माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर, दक्षिण गोव्यातून अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत आदींचा समावेश आहे.

काँग्रेसतर्फे विरियातो, चोडणकर, ॲड. खलप यांच्‍या नावांची चर्चा

पंजाब व दिल्लीत आम आदमी पक्षाने काँग्रेसची साथ सोडल्याने उत्तर गोव्यात ‘आप’ची उमेदवारी अलीकडेच मगोची साथ सोडलेले नरेश सावळ यांना मिळेल, अशी चर्चा आहे. काँग्रेसने दक्षिण गोव्यात ख्रिस्ती उमेदवार द्यायचा झाल्यास कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या नावाचा विचार होऊ शकतो तर हिंदू नावाचा विचार झाल्‍यास काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांच्‍या नावाला पसंती दिली जाऊ शकते. उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप च्या नावाचा विचार काँग्रेसने चालवल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com