Goa Politics: संख्‍येने कमी असूनही विरोधक सरकारला भारी!

Goa Politics: अधिवेशन गाजवले : ॲड. फेरेरा, सरदेसाई, एल्टन, वीरेश, व्‍हेंझी, युरी चमकले
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: सात दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन काल शनिवारी संपले. या अधिवेशनात संख्‍येने कमी असूनही विरोधकांनी आपली भूमिका चोख बजावली. ॲड. कार्लुस फेरेरा यांच्या अभ्यासपूर्ण सूचना सरकारला विचार करायला लावणाऱ्या ठरल्‍या. शिवाय नवखे असूनही आमदार एल्टन डिकॉस्‍टा, वीरेश बोरकर, व्‍हेंझी व्हिएगस, युरी आलेमाव यांनी आपली चमक दाखविली.

फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेपासून (शुक्रवार) अधिवेशनाला सुरूवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दिवशीच सभापतींनी आपल्याच सरकारातील मंत्री गोविंद गावडे यांच्या कला व संस्कृती खात्याने वाटप केलेल्या कार्यक्रमाच्या निधींवरून आरोप केला.

काणकोणातील काही सरपंचांच्या वतीने या निधी वाटपाच्या चौकशीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मंत्री गावडे व सभापती तवडकर यांच्यातील वादाचा मुद्दा विरोधकांना आयताच सरकारला घेरण्यासाठी मिळाला. परंतु त्यानंतर शनिवार व रविवार आल्याने या वादातील हवा कमी झाली.

सोमवारी अधिवेशनाच्या सुरूवातीच्या काळात विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी मंत्री गावडे यांचा राजीनामा मागण्याची तयारी सुरू केली होती. याविषयी प्रश्‍न उपस्थित होणार तोच सभापती तवडकर यांनी त्यास बगल दिली. हा वाद पक्षापुरता मर्यादित असल्याचे सांगून सरकारने तो गुंडाळला.

Goa Politics
Borim Fire Case: बोरीत कचऱ्याला लावली आग; शेड जळून खाक

अधिवेशनात दाबोळी विमानतळाचा विषय आलाच. सरदेसाई यांनी ‘दाबोळी’ बंद करण्याची सरकारची खेळी असल्याचा आरोप केला. आमदार फेरेरा यांनी पत्रादेवी ते मडगाव या चौपदरीकरणाचे काम २०२३ अखेरीस पूर्ण होईल असे आश्‍वासन मागील वर्षाच्या अभिभाषणात राज्यपालांनी दिले होते, पण काम पूर्ण झालेच नाही, याची आठवण सभागृहाला करून दिली होती.

विजय सरदेसाई हे राजकारणात अनुभवी असल्याने कोणत्या मुद्याला हात घालायचा हे त्यांना चांगलेच ज्ञात आहे. परंतु मागील काही अधिवेशनांच्या अनुवभवातून आमदार आलेमाव, डिकॉस्‍टा, सिल्वा, व्हेंझी, बोरकर यांनीही आपली प्रगल्भता दाखविली आहे. लेखी उत्तरातील तफावती या सरकारने केलेल्या चुका असल्याचे सांगण्यास हे कचरले नाहीत.

ॲड. फेरेरांनी सरकारला दाखवून दिल्‍या चुका

ॲड. कार्लुस फेरेरा हे पेशाने वकील असल्याने अनेक विषयांचा अभ्यास करूनच ते बोलतात. अनेकदा सरकारला त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरातील चुका, कायदा दुरुस्त्यातील वाक्य बदलही सुचविले आहेत आणि ते सरकारने स्वीकारले आहेत. एखाद्या विषयावर सखोलपणे भाष्य करण्याचा त्यांचा अंदाज वाखणण्‍याजोेगे होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com