Banastarim Bridge Accident: मर्सिडीजमधील 'त्या' महिलेला पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न: प्रतिमा कुतिन्हो

म्हार्दोळ पोलिसांना जमावाने केला प्रश्न : अटकेकडे लक्ष, रात्री उशिरापर्यंत दिवाडीवासीयांचा ठिय्या
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

Banastarim Bridge Accident: प्रत्यक्षदर्शीने जबानी दिल्यानंतर महिलाच वाहन चालवीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या दिवशी हा अपघात घडला, त्यावेळी गाडी कोण चालवत होते, असा संशय असताना पोलिसांनी महिलेचीही वैद्यकीय तपासणी करायला हवी होती. ती का केली नाही, असा सवाल दिवाडी येथील नागरिकांनी आज उपस्थित केला.

(Pratima Coutinho alligations on Government in Mercedes Banastarim Bridge Accident case)

Banastarim Bridge Accident
Goa Assembly Monsoon Session: प्रशासन कोलमडल्यानेच ‘सरकार तुमच्या दारी’; खर्चही अनाठायी- युरी आलेमाव

हाच प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित करीत त्यांनी पोलिसांना घेरले. रात्री उशिरापर्यंत लोकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकासमोर ठिय्या मांडला होता. परेश सावर्डेकर यांच्या पत्नीस वाचविण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का, असा सवालही संतप्त नागरिकांनी आहे. बुधवारी 12 वाजेपर्यंत महिलेस अटक केली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राजकीय हस्तक्षेप : बाणस्तारी पुलावरील अपघातानंतर राज्यात ‘राजकारण’ सुरू झाले आहे. हा विषय विधानसभेत पोहचल्यावर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी विरोधकांनी सोडलेली नाही. ज्या वाहनामुळे अपघात झाला, तो वाहनमालक ‘हायप्रोफाईल’ असल्याने त्याला पोलिसांसह काही नेते वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. निष्पापांचे जीव घेणाऱ्याला सोडू नये, मग तो कुणीही असो, असे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी विधानसभेत म्हटले. दुसरीकडे, अपघात प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींना शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

Banastarim Bridge Accident
Calangute News: कळंगुटमधील पबमध्ये IPS अधिकाऱ्याने काढली महिलेची छेड? पोलिस दलात खळबळ

बाणस्तारी अपघातातील प्रत्यक्षदर्शीने याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. अपघातावेळी महिलाच कार चालवत होती, अशी मला खात्री आहे. असे या प्रत्यक्षदर्शीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीमुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अपघातावेळी कार नक्की कोण चालवत होते, हा तिढा सोडवण्यासाठी पोलिस सीसीटीव्हीची मदत घेणार असल्याची माहिती आहे. संशयित कारचालक परेश यानेही कार तो चालवत असल्याची कबुली दिली आहे. पुढे त्याची पत्नी बसली होती, तर मागे दोन मुले होती, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

राजेश फळदेसाई, कुतिन्होंचा संताप

आरोपींना शिक्षा मिळालीच पाहिजे, आम्ही वकील देण्याची व्यवस्था करू, असे कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले. दुसरीकडे, ‘आप’च्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनीही संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, या प्रकरणात सरकारी हस्तक्षेप वाढला असून परेशच्या पत्नीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी निःपक्षपातीपणे तपास करायला हवा.

Banastarim Bridge Accident
Sesa Goa Mine: विरोध रोखण्यासाठीच सामाजिक कामं; मात्र वेळ पडल्यास उच्च न्यायालयातही जाऊ- शेतकऱ्यांचा इशारा

बाणस्तारी अपघात ही राज्यातील अत्यंत दुदैवी घटना आहे. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होता कामा नये. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे.

- राजेश फळदेसाई (आमदार कुंभारजुवे )

भाजप सरकारच्या काळात न्याय नावाची चीजच शिल्लक राहिलेली नाही. बाणस्तारी अपघाताला कारणीभूत त्या महिलेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे हे आम्ही खपवून घेणार नाही.

- प्रतिमा कुतिन्हो ( आप नेत्या )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com