Calangute News: कळंगुटमधील पबमध्ये IPS अधिकाऱ्याने काढली महिलेची छेड? पोलिस दलात खळबळ

सोमवारी रात्रीची घटना, व्हिडिओ झाला व्हायरल, चौकशी होणार
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

IPS officer molested a woman in Calangute pub: गोव्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने कळंगुट येथील एका पबमध्ये महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. कळंगुटमधील एका प्रसिद्ध पबमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी संबंधित आयपीएस अधिकाऱ्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

Goa Police
Banastarim Bridge Accident: 'आम्हाला न्याय द्या’; बाणास्तरीतील मृतांच्या नातेवाईकांचे सरकारकडे साकडे; दिवाडी बेटावर शोककळा

या आयपीएस अधिकाऱ्याचा संबंधित महिलेशी आणि तिच्या मित्राशी वाद झाला. त्यातून अधिकाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्याची चर्चा आहे. याचा व्हिडिओही समोर आल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ राज्य सरकारमधील सूत्रांपर्यंत पोहचल्यावर या घटनेची चर्चा सुरू झाली.

त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री आणि गृह मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच या प्रकरणाची दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे या अधिकाऱ्याची चौकशी सुरू केल्याचे समजते.

राज्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने पबमध्ये महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे पोलिसांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com