Goa Assembly Monsoon Session 2023: प्रशासन कोलमडल्यामुळेच भाजप सरकारला ‘सरकार तुमच्या दारी’सारखे उपक्रम राबवावे लागले.
त्यालाही शंभरेकजणच उपस्थित राहिल्याने जनतेचा या सरकारवर विश्वास राहिला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली.
त्यांनी एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तराचा हवाला देत यावर १२ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला.
मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर दोन कोटी रुपयेच खर्च केल्याचे नमूद केले. १२ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद होती, असेही ते म्हणाले.
याविषयीचा मूळ प्रश्न आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी विचारला होता. ते म्हणाले, पूर्वी राजे-महाराजे दरबार भरवत होते.
आता सरकारला आपण महाराजे आहोत, असे वाटते का? कारण आता सरकार जनता दरबार भरवू लागले आहे.
असे करताना उत्तर गोव्यात १९ हजार ६२१ रुपये तर दक्षिण गोव्यात ८६ हजार १०५ रुपये खर्च केले. ही तफावत का? प्रशासन काम करत नाही म्हणून तालुका पातळीवर असे कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ आली का? जनता दरबारात मांडलेले प्रश्न सुटलेले नाहीत, याची दोन उदाहरणे माझ्याकडे आहेत.
ध्वनी प्रदूषण व कार्यालय स्थलांतर असे ते विषय आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, काम करणाऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवली जाते.
दोन महिन्यांत जनता दरबारात मांडलेले प्रश्न सुटतील. ध्वनी प्रदूषण मापन यंत्रे घेतली आहेत तर कार्यालय स्थलांतराची पूर्वतयारी सुरू आहे.
आलेमाव यांनी उत्तर व दक्षिण गोव्यात जनता दरबारासाठी अनुक्रमे केवळ १६८ व १०४ जणच उपस्थित होते याकडे लक्ष वेधून विचारले, की ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी प्रत्येकवेळी घेण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.