मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मोठा फेरबदल! 34 पोलिस निरीक्षक, 6 उपअधीक्षकांच्या बदल्या; उत्तर गोव्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांचीही उचलबांगडी

Police Reshuffle Goa: राज्यात लागोपाठ पडलेल्या तीन सशस्त्र दरोड्यांनंतर बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात लागोपाठ पडलेल्या तीन सशस्त्र दरोड्यांनंतर बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला २४ तास उलटण्याआधीच गुरुवारी राज्यातील ३४ निरीक्षकांसह सहा उपअधीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. शिवाय उत्तर गोव्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांची उचलबांगडी करताना त्यांच्या जागी हरिश्‍चंद्र मडकईकर यांची नेमणूक केली आहे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पोलिस दलात मोठा फेरबदल करत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांची बदली केली असून त्यांच्या जागी वरिष्ठ अधिकारी हरिश्चंद्र मडकईकर यांची नेमणूक केली आहे. ही बदली तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. तसेच ६ उपअधीक्षक आणि ३४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांना त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसोबत कोकण रेल्वे पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

ही मोठी हालचाल राज्यात वाढत चाललेल्या गुन्ह्यांमुळेच सरकारला करावी लागली, असे सूत्रांनी सांगितले. कालच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत पोलिस दलाची उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर पोलिस दलात वेगाने फेरबदल सुरू झाले.

या बदलात सायबर, गुन्हे शाखा, वाहतूक आणि किनारी पोलिस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अनेक प्रमुख पोलिस ठाण्यांचे निरीक्षकही बदलले असून तपासातील गती वाढविणे, नाकाबंदी बळकट करणे आणि स्थानिक पातळीवरील तपासाची जबाबदारी अधिक तीव्रतेने पार पाडणे, या उद्देशाने या हालचाली केल्याचे सूत्रांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Police: बदलीच्‍या ठिकाणी रुजू व्‍हा,अन्‍यथा आता वेतन थांबवणार; पोलिस मुख्यालयाचा 'त्या' 68 पोलिसांना इशारा

मुख्यमंत्र्यांनी ओढले कडक ताशेरे

कालच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी, राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर नाराजी व्यक्त करत पोलिसांना कठोर शब्दांत धारेवर धरले होते. काही गंभीर गुन्ह्यांची माहिती वेळेवर न देणे, तपासातील ढिलाई आणि नाकाबंदीतील त्रुटी या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी कडक ताशेरे ओढले होते.

CM Pramod Sawant
Goa Police: '..अशीच स्थिती राहिल्यास गोव्‍यात पर्यटनालाही धाेका'; सरदेसाईंचा इशारा; पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ठेवले बोट

तिसऱ्या दिवशीही बायणा दरोडाप्रकरणी तपास शून्य

बायणा येथील सशस्त्र दरोड्याची माहिती पोलिसांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाली होती. तरीही तिसऱ्या दिवशीपर्यंत पोलिसांना दरोडेखोरांना ताब्यात घेतला आलेले नाही. पोलिसांनी विविध पथके तयार करून चौकशीला वेग दिला आहे. निरनिराळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून काही हाती लागते काय, याचा शोध घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com