Pramod Sawant Amit Shah Meeting: गोव्यातील 'एसटी' आरक्षणाचा तिढा सुटणार?मुख्यमंत्र्यांची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा, गोवा दौऱ्यासाठीही आमंत्रण

Goa ST Political Reservation: केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विषयावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
Goa ST Political Reservation
Pramod Sawant Amit Shah MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण लवकरात लवकर लागू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली.

यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विषयावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची, पायाभूत सुविधा उभारणीची तसेच लोककल्याणकारी योजनांची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली.

Goa ST Political Reservation
Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते गोवा पोलिसांना बहाल करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘पोलिस कलर्स’ सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण अमित शहा यांना दिले.

हा समारंभ गोवा पोलिसांच्या शिस्तबद्ध व उल्लेखनीय सेवेचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण सोहळा ठरणार आहे. याशिवाय, गोवा भाजपच्या नव्या मुख्यालयाच्या उदघाटन समारंभासाठीही अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले.

Goa ST Political Reservation
'पोर्तुगीज येण्यापूर्वीपासून गोमंतकीय वारी करतायेत', CM सावंतांचं वक्तव्य; भक्तांसाठी उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'

विकासाशी संबंधित मुद्यांवर झाली चर्चा

अनुसूचित जमातींना विधानसभेत राजकीय आरक्षण मिळावे, ही गोव्यातील दीर्घकालीन मागणी असून, मुख्यमंत्री सावंत यांनी या विषयावर केंद्र सरकारसमोर पुन्हा ठाम भूमिका मांडल्याने या प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student Protest Police Lathicharge
Amit Shah, BL Santosh Goa visit
Goa Warkari Tradition History Before Portuguese
Pramod Sawant On Konkan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com