Goa Government: पोर्तुगीजकालीन खजिना होणार जनतेसाठी खुला

Goa Government: मुख्यमंत्री : खजिना किती मौल्यवान याची माहिती अद्याप नाही
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Government:

भारतीय सैन्याने आक्रमण केल्यानंतर घाईगडबडीत गोवा सोडून जाताना पोर्तुगीज सरकारने मागे ठेवलेल्या खजिन्याचा बराचसा भाग आता जनतेला पाहण्यासाठी खुला होणार आहे. 1961 नंतर लेखा संचालनालयातील एका तिजोरीत हा खजिना बंद होता.

हा खजिना किती मौल्यवान आहे याची माहिती सरकारने तज्ञांकडून अद्याप घेतलेली नाही. यात सापडलेले दागदागिने पोर्तुगीजकालीन आहेत की आदिलशाही किंवा त्यापूर्वी राजवटीतील आहेत याचीही खातरजमा अद्याप झालेली नाही.

‘आदिलशहाचा राजवाडा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या सचिवालय इमारतीच्या मागे असलेल्या फाजेंद इमारतीतील तिजोरीत हा खजिना होता. त्या तिजोरीत असलेल्या खजिन्याची गणती यापूर्वी 1961 आणि 1994 मध्ये करण्यात आली होती.

Goa CM Pramod Sawant
South Goa: दक्षिण गोव्यात सुरू करणार खासगी वैद्यकीय महाविद्यालय

त्या इमारतीत कार्यरत असलेले लेखा संचालनालय आता पर्वरीत हलवण्यात आल्याने तिजोरी हलवण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी ती उघडून त्यातील खजिन्याची मोजदाद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. व्यक्त केली.

प्रधान वित्त सचिव लेखा संचालक अशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती त्यासाठी नेमण्यात आली आणि त्यांच्या समक्ष अगदी चित्रीकरण करत तिजोरी उघडण्यात आली आणि त्यातून हा खजिना सुरक्षित असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी दोन वेळा उघडलेल्या तिजोरीतील नोंदीशी आता केलेल्या नोंदी जुळल्या आहेत.

Goa CM Pramod Sawant
South Goa: दक्षिण गोव्यात सुरू करणार खासगी वैद्यकीय महाविद्यालय

मुख्यमंत्र्यांना या खजिन्याच्या मूल्यांकनाविषयी विचारले असता ते म्हणाले, तसा प्रयत्न अजून कोणी केलेला नाही. गोवा मुक्त झाला तेव्हापासून हा खजिना तिजोरीत पडून होता. आता तिजोरीचे कुलूपही गंजत चालले होते.

त्यामुळे आता नवी व्यवस्था करावी लागणार म्हणून तिजोरी उघडणे भाग होते. त्यांनी हा नेमका पोर्तुगीजकालीनच खजिना असेल की त्यापूर्वीच्या राजवटीतील हे दागदागिने, वैयक्तिक वापरातील वस्तू असतील याबाबत सांगण्यास असमर्थता

विविध धातू, मुद्रांची नाणी

तिजोरीत पाचेक हजार विविध प्रकारची विविध धातूंची आणि विविध मुद्रा असलेली नाणी आहेत. त्याशिवाय स्त्रियांच्या शृंगारासाठी वापरण्यात येणारी आभूषणे तसेच मौल्यवान जडजवाहिरे तिजोरीत होते. मोठ्या व्यक्तींच्या वापरात असणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तूही या तिजोरीत आहेत. युरोपीय देशातील राजांचे मुखवटे काही नाण्यांवर आहेत. सुमारे दोन किलो सोन्याचे दागिनेही आहेत. वैयक्तिक वापरातील काही वस्तूही आहेत.

सर्व दुर्मीळ वस्तू सुरक्षित

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की लेखा संचालनालयाच्या जुन्या इमारतीत असलेला पोर्तुगीजकालीन खजिना सुरक्षित आहे. 100 किलो वजनाची पाच हजाराहून दुर्मीळ नाणी आणि 33 दुर्मीळ नोटा, सव्वादोन किलो सोन्याचे वेगवेगळे दागिने व इतर व्यक्तिगत वापरातील दुर्मीळ वस्तू सुरक्षित असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com