South Goa: दक्षिण गोव्यात सुरू करणार खासगी वैद्यकीय महाविद्यालय

South Goa: मुख्यमंत्र्यांची माहिती: जनतेला मिळणार मोफत उपचार
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa:

राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ परिसरात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहे. पुढील वर्षाच्या जून महिन्यापासून या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकारांना दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवरच मडगाव येथील जिल्हा इस्पितळाला लागून हे महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. महाविद्यालय सुरू केले म्हणून कोणतेही उपचार सशुल्क केले जाणार नसून गोमेकॉप्रमाणेच मडगावच्या इस्पितळातही सर्व सुविधा निर्माण करून जनतेला मोफतच उपचार मिळणार आहेत.

ते म्हणाले, मुख्यमंत्री या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पदसिद्ध असतील. याशिवाय या विश्वस्त मंडळावर विरोधी पक्षनेते आणि विधानसभेत प्रतिनिधित्व असलेल्या राजकीय पक्षांचे नेते संचालक म्हणून असतील.

CM Pramod Sawant
Goa Education: शैक्षणिक बदल! राज्यात यंदापासून अकरावी, बारावीचे विभाग रद्द

स्थानिक विद्यार्थ्यांना आरक्षण

गोव्यातील विद्यार्थ्यांना या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पूर्णतः आरक्षण मिळेल. त्याशिवाय जनतेला मोफत उपचार मिळतील असे सांगून ते म्हणाले, दहा हजार चौरस मीटर जमीन या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी लागणार आहे.

बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या सर्व सुविधा आता मडगावच्या इस्पितळातच उपलब्ध केल्या जातील. यामुळे दक्षिण गोव्यातील रुग्णांना अधिक उपचारासाठी बांबोळी येथे धाव घ्यावी लागणार नाही.

CM Pramod Sawant
Goa Mining: खनिजावरील निर्णय वादाच्या भोवऱ्यात

कंत्राटी कर्मचारी नेमणुकीस मंजुरी

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी लागणारे कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर नेमण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

बांबोळीच्या मानसोपचार इस्पितळात मानसशास्त्रीय सामाजिक कल्याण यासाठी दोन पदे निर्माण करून ती भरली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व वैद्यकीय महाविद्यालयात ‘पेट स्कॅन’ ही सुविधा येत्या वर्षभरामध्ये विकसित केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून देकार मागवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhangar Community ST Status
FIFA World Cup 2026
South Korea former president sentenced
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com