
पणजी: सरकार चोडण-रायबंदर जलमार्गावर १ जुलैपासून ‘रो-रो’ फेरी सुरू करण्याच्या तयारीत आहे, परंतु यापूर्वी सुरू केलेल्या सोलर फेरीसारखीच या फेरीची देखील स्थिती होईल की काय, याबाबत प्रवाशांना आतापासूनच चिंता सतावत आहे.
सरकारने सौर उर्जेवर चालणारी पहिली प्रवासी फेरी ‘सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड’चे ऑक्टोबर २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. यामुळे पणजी ते चोडण येथील रायबंदरला न जात थेट पणजीत येऊ शकत होते. येथील रहिवाशांची सोय म्हणून ही फेरी सुरू करण्यात आली होती मात्र त्याचा वापर झालेला लोकांना काही दिसला नाही. अजूनही ही फेरी बंद अवस्थेत पडून आहे.
१३ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्रीय बंदर, जलवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत गोव्यातील पहिल्या सौर-ऊर्जेवरील हायब्रीड प्रवासी फेरी आणि फ्लोटिंग जेटीचे लोकार्पण करण्यात आले होते.
सुमारे ३.९ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही फेरी पणजी-चोडण मार्गावर सुरू होणार होती. सुरवातीच्या १५ दिवसांसाठी प्रवास मोफत ठेवण्यात येणार होता, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु ही फेरी पूर्णपणे बंद अवस्थेत पडून आहे.
पणजीतील फ्लोटिंग जेटीवर ती पडून आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळच नाही, अशी कबुली नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देखील दिली होती.
ते म्हणाले होते की, ही पारंपरिक फेरी नव्हे, हायब्रीड प्रणालीमुळे प्रशिक्षित कर्मचारी लागतात. आम्ही सध्या उत्पन्नाचे मॉडेल शोधत आहोत. नदी परिवहन खात्याने चोडण-रायबंदर मार्गावर ''रो-ऑन/रो-ऑफ'' (रो-रो) फेरीचे यशस्वी चाचणी नुकतेच पूर्ण केली आहे.
पर्यटकांसाठी ५०, पर्यटक वाहन दुचाकी १००, चारचाकी ३०० रु.
स्थानिकांसाठी प्रवास मोफत, दुचाकी १०, चारचाकी ३० रु.
मासिक पासचीही योजना – दुचाकी ५, चारचाकी १५ रु.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.