Goa Politics: नोकरी घोटाळा प्रकरणावरून भाजप काँग्रेसमध्ये कलगीतुरा! आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या

Cash For Job Scam: सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणातील पैसा कुणापर्यंत पोचत होता, याची जनतेला प्रतीक्षा असतानाच तो मुद्दा बाजूला ठेवत यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Cash For Job Scam, Goa Government Job Scam
CM Pramod Sawant, Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cash For Job Scam

पणजी : सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणातील पैसा कुणापर्यंत पोचत होता, याची जनतेला प्रतीक्षा असतानाच तो मुद्दा बाजूला ठेवत यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडील खात्यासंदर्भात बनावट कागदपत्रे या प्रकरणी फडकावल्यानंतर राणे यांनी लगेच खातेप्रमुखांना याविषयी पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र या आरोपांचा इन्कार केला. असा आरोप करताना सोबत पुरावे द्या, अशी मागणी सूत्रांनी केली.

भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी याप्रकऱणी चौकशी करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे काल म्हटले होते. भाजप प्रवक्ते ॲड. यतीश नाईक म्हणाले या प्रकरणावरून विरोधक राजकारण करत आहेत. त्यांना या प्रकरणी सत्य बाहेर आलेले नको आहे, असा जाहीर आरोप केला आहे.

आयोगामार्फत किती नोकऱ्या दिल्या?

२०२२ साली विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही नोकर भरती ही कर्मचारी निवड आयोगामार्फत केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु भाजपने नोकर भरती ही कर्मचारी निवड आयोगामार्फत केली जाईल, असे सांगितले खरे; पण किती नोकऱ्या या आयोगामार्फत दिल्या गेल्या, याची आकडेवारी नाही, असे अमित पाटकर म्हणाले.

Cash For Job Scam, Goa Government Job Scam
Pooja Naik Case: ..अखेर 'पूजा नाईक'ने दिली कबुली! घेतली 'एवढी' रक्कम

पोलिसच ‘शिकार’

पत्नीला सरकारी नोकरी मिळावी, यासाठी एका पोलिस शिपायाने संशयित दीपश्री सावंत हिला ५ लाख रुपये दिले. तो पोलिस शिपाई मंत्र्यांच्या संरक्षण दलातील असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांची उपस्थिती होती. पाटकर म्हणाले, जॉब फॉर स्कॅम प्रकरणात आतापर्यंत तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com