Pooja Naik Case: ..अखेर 'पूजा नाईक'ने दिली कबुली! घेतली 'एवढी' रक्कम

Cash For Job Scam: सरकारी नोकरीसाठी पर्वरीतील प्रिया मांद्रेकर हिच्याकडून सतरकर जोडप्यामार्फत ४ लाख रुपये घेतल्याची स्पष्ट कबुली संशयित पूजा नाईक हिने पर्वरी पोलिसांना दिलेल्या जबानीत दिली आहे.
Pooja Naik case, Cash For Job Scam, Goa Government Job Scam
Pooja Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Suspect Pooja Naik Admits to Bribery in Government Job Scam

पणजी: सरकारी नोकरीसाठी पर्वरीतील प्रिया मांद्रेकर हिच्याकडून सतरकर जोडप्यामार्फत ४ लाख रुपये घेतल्याची स्पष्ट कबुली संशयित पूजा नाईक हिने पर्वरी पोलिसांना दिलेल्या जबानीत दिली आहे. तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती, ती शनिवारी संपणार आहे. सध्या पूजाविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकात एकच तक्रार दाखल झाली आहे.

तिने जामिनासाठी अर्ज केलेला नाही, अशी माहिती पर्वरीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. प्रिया मांद्रेकरने पतीच्या बँक खात्यातून सरकारी नोकरीसाठी ४ लाख रुपये दिले होते. ही रक्कम तिने अजित सतरकर आणि अनिशा सतरकर यांच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी जमा केली होती. त्यामुळे पैसे दिल्याचा पुरावा बँक खात्याच्या दस्तावेजावरून स्पष्ट झाला होता. पोलिसांनी संशयित पूजा आणि तिचे मध्यस्थी सतरकर जोडप्याला समोरासमोर बसवून चौकशी केली.

पूजाने घातली शेकडोजणांना टोपी

पूजा नाईक हिच्या सरकारी नोकरीच्या जाळ्यात सुमारे शंभरजण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूजाने या कामासाठी काही गावांमध्ये एजंट ठेवले होते. त्या एजंटांमार्फत ती पैसे घेत होती. अजित सतरकर आणि श्रीधर सतरकर या दोघांनी अनेकांकडून पैसे घेऊन ते पूजाकडे दिले होते.

Pooja Naik case, Cash For Job Scam, Goa Government Job Scam
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी दिली खुशखबर! नोकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा विशेष कार्यक्रम

रामेश्वरच्या कोठडीत वाढ

‘कॅश फॉर जॉब्स’प्रकरणी मोर्ले-सत्तरी येथील रामेश्वर आत्माराम मांद्रेकर याला काणकोण पोलिसांनी अटक केली होती. त्याला प्रथम सत्र न्यायालयाने अतिरिक्त दोन दिवसांची पोलिस कोठडी फर्मावली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित रवीन भंडारी याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे, असे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी सांगितले. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वेलवाडा-पैंगीण येथील कृष्णा नाईक याच्याकडून या दोघांनी ५ लाख रुपये उकळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com