Ponda: फोंड्यात राजकीय हालचालींना उधाण! रवी नाईक ‘वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

Ponda Politics: २०२४ साल संपत असताना फोंड्यात राजकीय हालचाली तीव्र होताहेत. विधानसभा निवडणुकीला केवळ दोनच वर्ष उरल्यामुळे इच्छुकांतील चुरस वाढत आहे.
Ravi Naik, Ponda
Goa Minister Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: २०२४ साल संपत असताना फोंड्यात राजकीय हालचाली तीव्र होताहेत. विधानसभा निवडणुकीला केवळ दोनच वर्ष उरल्यामुळे इच्छुकांतील चुरस वाढत आहे. सर्वांच्या नजरा कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश, विश्वनाथ दळवी व फोंड्याचे मगो नेते डॉ.भाटीकर यांच्यावर आहेत. काँग्रेसचे राजेश वेरेकर यांची रणनीती स्पष्ट झालेली नाही.

फोंड्यात सध्या अनेक समस्या प्रलंबित असून सुद्धा काँग्रेस त्यावर आवाज उठविताना दिसत नाही. या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व इच्छुक उमेदवार पक्षापेक्षा स्वतःच्या कार्याला प्रोजेक्ट करायला लागले आहेत. विश्वनाथ दळवी हे फोंडा भाजपचे गटाध्यक्ष असून ते आपल्या संस्थेतर्फे कार्य करताना दिसतात. भाटीकर हेही म. गो. चे नेते असून ते सुद्धा स्वतंत्ररीत्या वावरताना दिसतात. रितेश यांचे वडील रवी नाईक हे मंत्री असल्यामुळे फोंड्यातील अनेक सरकारी कार्यात त्यांचा वाटा असल्याचे दिसून येते. याचा त्यांना भविष्यात फायदाही होऊ शकतो.

दुसरी खासियत म्हणजे कार्यकर्त्यांची आयात निर्यात. निवडणुकीवेळी होणारी ही कार्यकर्त्यांची आयात निर्यात फोंड्यात आतापासूनच सुरू झाली आहे. आज इधर तो कल उधर' अशी वृत्ती बाळगून कार्य करणारे अनेक कार्यकर्ते दिसायला लागले आहेत. त्यामुळे निवडणुका दोन वर्षे दूर असून सुद्धा फोंड्यात आतापासूनच निवडणुकीचे वातावरण दिसायला लागले आहे. यामुळे फोंडा मतदारसंघात शह-काटशहाचे राजकारण रंगायला लागले आहे. नव्या वर्षाच्या शेवटी झेडपी निवडणूक होणार असल्यामुळे या मतदारसंघातील एकमेव पंचायत कुर्टी-खांडेपार यावर इच्छुक उमेदवारांनी लक्ष केंद्रित आहे. सध्या सामाजिक उपक्रमांचे पीक आले असले तरी तो कही पे निगाहे कही पे निशाना'चा प्रकार असल्याचे लपलेले नाही.

रवी नाईक ‘वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार हे नेहमीप्रमाणे ''वेट अँड वॉच''च्या भूमिकेत दिसत असून कोणते आयुध कोणत्या वेळी बाहेर काढायचे हे माहीत असल्यामुळे ते बिनधास्त दिसत असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल हे कळणे यामुळेच अवघड झाले आहे.

Ravi Naik, Ponda
Ponda: फोंड्यात भाजप ‘धक्कादायक’ निर्णय घेणार का? जि. पं. निवडणुकीवरुन राजकीय हालचालींना वेग, 'रवीं'च्या भूमिकेवर लक्ष

भाटीकरांची रिंगणात उतरण्याची गर्जना

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-मगोपची युती होण्याची शक्यता गृहीत धरून भाटीकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पंचायत, पालिका निवडणुकीनंतर आता आगामी झेडपी निवडणुकीत सुद्धा ते स्वतंत्ररीत्या उमेदवार उतरविण्याच्या प्रयत्नाला लागले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Ravi Naik, Ponda
Goa Politics Flashback 2024: विरोधक हतबल; मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित हाताळले नोकरी घोटाळा प्रकरण

दळवींची शिबिरांमागून शिबिरे

फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा झपाटा लावला असून त्यातून ते मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या शिबिरांना चांगली उपस्थिती लाभत असली तरी या उपस्थितीचे रूपांतर मतदानात होते की काय हे बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com