Ponda: फोंड्यात भाजप ‘धक्कादायक’ निर्णय घेणार का? जि. पं. निवडणुकीवरुन राजकीय हालचालींना वेग, 'रवीं'च्या भूमिकेवर लक्ष

Ponda Zilla Panchayat Election: महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल विपरीत लागल्यामुळे फोंड्याची काँग्रेस सध्या थोडी ‘बॅक फूट’वर गेल्यासारखी वाटत असली तरी त्यांनी झेडपी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी उमेदवार निवड प्रक्रियेला प्रारंभ केला असून येत्या काही दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असे काँग्रेस गोटातून सांगितले जाते.
Ravi Naik Ponda
Ravi Naik |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Curti Zilla Panchayat Election

फोंडा: फोंडा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. फोंडा मतदारसंघात कुर्टी ही एकमेव जिल्हा पंचायत येत असली तरी या जिल्हा पंचायतीत फोंडा मतदारसंघातील एकमेव कुर्टी-खांडेपार पंचायत येत असल्यामुळे या जि.पं.ला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम समजली जाते.

फोंड्यात सध्या भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे या उमेदवारीकरता रस्सीखेच होण्याचे संकेत मिळत आहेत. कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र तथा फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक, भाजपचे फोंडा गटाध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी हे या उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जात असले तरी भाजपच्या प्रथेप्रमाणे ऐनवेळी एखादा ‘धक्कादायक’ निर्णय घेतला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. पण यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरायचेच, असा जाहीर पण दळवी यांनी केला असून त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’ संस्थेद्वारे ते शहरात विविध उपक्रम राबविताना दिसतात. आता झेडपी निवडणुकीत ते कोणती रणनीती आखतात, ते बघावे लागेल.

गेल्या खेपेला केवळ ७७ मतांनी निवडणूक हरलेले मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांनी सध्या झेडपी निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून कुर्टी जिल्हा पंचायत कशी जिंकायची, याची ते व्यूहरचना आखू लागले आहेत. कुर्टीच्या विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी या त्यांच्या गोटातल्या असल्यामुळे ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. सध्या मगोप सरकारात असल्यामुळे ते भाजप उमेदवाराला पाठिंबा देतात की, स्वतंत्र निवडणूक लढवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अशा स्थितीत भाटीकर कोणती भूमिका घेतात, यावर राजकीय तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल विपरीत लागल्यामुळे फोंड्याची काँग्रेस सध्या थोडी ‘बॅक फूट’वर गेल्यासारखी वाटत असली तरी त्यांनी झेडपी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी उमेदवार निवड प्रक्रियेला प्रारंभ केला असून येत्या काही दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असे काँग्रेस गोटातून सांगितले जाते. पुढील वर्षभर उमेदवाराचा प्रचार करून आघाडी घेण्याची त्यांची रणनीती असल्याचे कळते. एकंदरीत झेडपीच्या धनुष्यबाणातून विधानसभेच्या लक्ष्यावर तीर मारण्याचा प्रयत्न सुरू झाला असून आता यात कोण किती यशस्वी होतो, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

पुन्हा प्रिया च्यारीच?

गेल्या खेपेला कुर्टी झेडपी मतदारसंघ हा महिलांकरता राखीव असल्यामुळे रिंगणात सगळ्या महिलाच होत्या. त्यातून मगोपच्या प्रिया च्यारी या विजेत्या ठरल्या होत्या. पण यावेळी हा मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता कमी असली तरी पुन्हा प्रिया च्यारीच रिंगणात उतरतील, असे संकेत मिळत आहेत. आता हे संकेत खरे होतात की काय, हे आगामी काळात कळेलच.

Ravi Naik Ponda
Vishva Hindu Parishad: 'गोव्यात हिंदूंची संख्या घटतेय, विचार न केल्यास भविष्यकाळ धोकादायक'; राजासिंग यांचा इशारा

रवींची भूमिका ठरणार निर्णायक

कृषिमंत्री रवी नाईक हे नेहमीप्रमाणे ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असून ते कोणता निर्णय कधी घेतील, हे सांगणे कठीण आहे. सहावेळा निवडून आल्यामुळे फोंडा मतदारसंघाचा त्यांचा गाढा अभ्यास असून कोणता चेंडू कसा टोलवायचा, याचे त्यांना चांगले आकलन आहे. झेडपी निवडणुकीबाबत ते सध्या बोलत नसले तरी उमेदवाराबाबत त्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे रितेशही सध्या ‘सायलंट मोड’वर असल्यासारखे दिसत आहेत.

Ravi Naik Ponda
Winter Trekking Goa: ट्रेकिंगसाठी गोवा आहे Best Option, का ते जाणून घ्या..

भिका केरकर ‘कुंपणावर’?

कुर्टी-खांडेपारचे सर्वांत ज्येष्ठ सदस्य भिका केरकर हे सध्या जिल्हा पंचायतीकरता इच्छुक असून कोणता पक्ष उमेदवारी देतो, याची वाट ते पाहात असल्याचे कळते. सध्या ते कोणत्याही पक्षाशी सलग्न नसल्यामुळे ‘कुंपणावर’ बसून वाट पाहण्याचे धोरण त्यांनी अवलंबिल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com