'रामराज्यासाठी गोव्यातील प्रजेनेही पुढाकार घ्यावा'

मुख्‍यमंत्री: रावणांचा विचार नको; डिचोलीत रामजन्‍मोत्‍सव
पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, संजय नाईक, सूर्यकांत देसाई आणि मान्‍यवर.
पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, संजय नाईक, सूर्यकांत देसाई आणि मान्‍यवर. Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: रामराज्य आणायचे असेल तर प्रजा म्हणजेच जनतेचे प्रयत्न तेवढेच महत्वाचे आहेत. त्‍यासाठी रावणांचा विचार करता कामा नये, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत बोलताना व्‍यक्त केले. प्रभू रामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने आपण जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणार अशी ग्वाही देऊन जनतेने विश्वास दाखवून आपल्याला पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्‍यांनी आभार मानले.

पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, संजय नाईक, सूर्यकांत देसाई आणि मान्‍यवर.
‘अवकाळी’ने झोडपले; इब्रामपुरात केळीच्या बागा आडव्या

विश्व हिंदू परिषदेच्या डिचोलीतील रामोत्सव समितीतर्फे श्रीरामनवमी निमित्त आयोजित ‘रामोत्सव: 2022’ सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित या सोहळ्याप्रसंगी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, विश्व हिंदू परिषदेचे गोवा राज्य प्रभारी तथा माजी आमदार मोहन आमशेकर, उत्तर जिल्हा मंत्री शंभू परब, रामोत्सव समितीचे अध्यक्ष उदय जांभेकर, कार्याध्यक्ष संजय नाईक, कोषाध्यक्ष सूर्यकांत देसाई आदी मान्‍यवर उपस्थित होते.

पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, संजय नाईक, सूर्यकांत देसाई आणि मान्‍यवर.
म्हापशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी सोहळा

सर्व मतभेद बाजूला ठेवून हिंदू संघटित झाले तर देशाचे भवितव्य निश्चित उज्‍ज्वल आहे, असा आशावाद मोहन आमशेकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात व्यक्त केला. तर, प्रमुख वक्ते शांतिसागर हावळे यांचे ‘श्रीराम महात्म्य’ या विषयावर व्याख्यान झाले. आरती, पसायदान आणि तीर्थप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

मुख्यमंत्र्यांनी केली आरती

ओंकार व श्रीराम जप तसेच भजन झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रतिकात्मक पूजन करून रामजन्म सोहळा पार पडला. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी श्रीरामांची आरतीही केली. यावेळी सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रामोत्सवाच्या उत्साहात भर घातली. पतंजलीच्या प्रशिक्षणार्थी मुलांनी योगासने करून मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांकडून वाहवा मिळविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com