‘अवकाळी’ने झोडपले; इब्रामपुरात केळीच्या बागा आडव्या

लाखोंची हानी: कृषी खात्याकडून नुकसानीची पाहणीही करण्यात न आल्याने शेतकऱ्यांत नाराजी
Unseasonal rain night
Unseasonal rain night Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पावसाने झोडपले अन् आभाळच फाटले तर शेतकऱ्यांनी न्याय मागावा तरी कुणाकडे , अशी अवस्था हिदुस इब्रामपूर येथील शेतकऱ्यांची झाली आहे. अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे आल्या मुळे प्राण गावस आणि इतर शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने,लाखो रुपयांची हानी सोसावी लागली आहे. चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे वाहिल्यामुळे हे संकट ओढवले आहे. चार दिवस उलटले तरी आजपर्यंत कृषी विभागाने किंवा अधिकाऱ्यांनी पाहणी न केल्याने शेतकरी नाराज बनले आहेत.

एका बाजूने सरकार शेती व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत, तर दुसऱ्या बाजूने उभीच्या उभी शेती उपद्रवी वन्यप्राणी उद्‍ध्वस्त करत आहेत. आणि त्यात निसर्गाचीही भर पडते आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून जलदगतीने नुकसान भरपाई मिळाली, तर त्यांना तो दिलासा ठरू शकतो,अशा प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.

Unseasonal rain night
लोलये पंचायत क्षेत्रात अंतर्गत रस्त्यांवरील पुलांची दुर्दशा

दरवर्षी पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान हे ठरलेले असते. परंतु अवकाळी पावसानेही झोडपून काढण्याचा प्रकार ऐन उन्हाळ्यात घडू लागला आहे. निसर्गाने झोडपले आणि आभाळच फाटले तर शेतकऱ्याने कुणाकडे न्याय मागावा,अशी बिकट स्थिती शेतकऱ्यांची सध्या झाली आहे. शेतीचे क्षेत्र राज्यात घटत असून काही मोजकेच शेतकरी शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यात केळी बागायती काजू, फणस, भुईमूग, मिरच्या, ऊस, चिटकी, मटकी, कुळीथ,अशी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. मात्र,शेतकऱ्यांच्या हाता तोंडापर्यंत आलेला घास,ज्यावेळी निसर्ग हिरावून घेतो, त्या वेळी एकच आधार असतो तो सरकारचा. परंतु सरकारच मदत देण्यास दिरंगाई करत असल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com