म्हापसा: ‘डॉ. आंबेडकर लोकशाही मंच’ या राज्यव्यापी संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता म्हापसा येथील डॉ. लोहिया उद्यानात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वपक्षीय राज्यस्तरीय आयोजन समितीची निवड करण्यात आली आहे.
या वेळी प्रमुख अतिथी म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा, सन्माननीय अतिथी हळदोणेचे आमदार कार्लुस फरेरा व म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, कार्यक्रमाचे निमंत्रक बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, गोवा कूळ-मुंडकार संघटनेचे अध्यक्ष दीपेश नाईक, समाजसेवक अविनाश भोसले यांची तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा नाट्य महाविद्यालयाचे प्राचार्य रामराव वाघ यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमाचे संयोजन उद्योजक सुभाष केरकर यांनी केले आहे.
राज्यस्तरीय आयोजन समितीत ‘गाकुवेध’चे सचिव रूपेश वेळीप, गोवा बहुजन संघाचे अध्यक्ष रवी हरमलकर, शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर, मानव हक्क आघाडीचे अध्यक्ष राजन घाटे, म्हापसा भागातील तारचे खाजन टेनंट असोसिएशनचे अध्यक्ष जॉन लोबो, इस्लामिक सेंटरचे अध्यक्ष रियाझ जामखानी, युनायटेड सिटिझन फोरमचे अध्यक्ष हरिहर चोडणकर, म्हापसा युवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आसोलकर, गोवा लोकशाही जन महासंघाचे सरचिटणीस समीत परवार, पेडणे येथील जनसंघ संघटनेचे अध्यक्ष दिवाकर जाधव, गोवा लोकशाही जन महासंघाचे सल्लागार कृष्णा गावकर व समाजसेवक रामदास बोरजे यांचा समावेश आहे. म्हापशात यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी होणार आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने बोलताना दीपेश नाईक यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.