
What happened on good Friday: पाम संडे ते इस्टर ख्रिस्ती धर्मीयांसाठी महत्वाचा काळ मानला जातो. मानवतेसाठी येशू ख्रिस्ताने केलेल्या त्यागाची आणि यामुळे त्याला मिळालेल्या नवीन जीवनाची आठवण म्हणून या आठवड्याला फार महत्व आहे. लहान मुलं हातात खजुराच्या फांद्या घेऊन उत्साहाने नाचत पाम संडेने या आठवड्याची सुरुवात करतात. पण यामागची खरी गोष्ट काय? हा आठवडा एवढा महत्वाचा का किंवा येशू ख्रिस्ताने दिलेल्या बलिदानाची, त्याच्या पुनर्जीवनाची कथा काय सांगते, चला जाणून घेऊया.
हा पवित्र आठवडा ‘पॅशन वीक’ म्हणून ओळखला जातो. ख्रिस्ती धर्मातील भाविकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र काळ आहे. हे आठ दिवस येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अंतिम घटनाक्रम आणि त्यांच्या क्रूसावरील बलिदान तसेच पुनरुत्थानाची आठवण म्हणून जगभरातील ख्रिस्ती समुदाय मोठ्या श्रद्धेने या आठवड्याचं पालन करतात.
पाम संडे (Palm Sunday)
येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या या पवित्र आठवड्याची सुरुवात पाम संडेने होते. या दिवशी येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात प्रवेश केला होता अशी कथा प्रचलित आहे.
तेव्हा काही लोकांनी खजुराच्या फांद्या हातात घेऊन त्याचं स्वागत केलं होतं. हा दिवस लोकांच्या मनात येशूबद्दल असलेला आदर दर्शवतो आणि लोकांनी येशूला त्यांचा राजा किंवा नेता म्हणून निवडला असल्याची साक्ष सुद्धा देतो.
होली थर्सडे (Holy Thursday)
होली थर्सडे हा या आठवड्यातील पाचवा दिवस आहे. या दिवशी येशूने त्याच्या शिष्यांसोबत शेवटचं जेवणं केलं होतं ज्याला होली युकारीस्ट असं देखील म्हटलं जातं. याच दिवशी येशूने कम्युनियनची स्थापना केली आणि तिथे आपल्या शिष्यांचे पाय धुवून सेवा आणि नम्रतेचा आदर्श घालून दिला होता. या दिवसापासून ईस्टर त्रिदुमची सुरुवात होते.
गुड फ्रायडे (Good Friday)
बायबलमधील (1 Corinthians 15:3) वचनानुसार याच दिवशी ख्रिस्ताने देह त्यागला होता. ख्रिस्ती धर्मीयांमध्ये गुड फ्रायडे हा दिवस येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मृत्यूचा स्मरण दिवस आहे, येशूच्या मृत्यूमुळे या दिवसाला ब्लॅक फ्रायडे किंवा होली फ्रायडे असं देखील म्हटलं जातं.
गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती भाविक उपवास करतात, अनेक चर्चमध्ये स्टेशन्स ऑफ द क्रॉस हा विधी आयोजित केला जातो. लोकांची पाप धुतली जावीत म्हणून येशू ख्रिस्ताने क्रूसावर अतोनात यातना सोसल्याची मान्यता आहे.
होली सॅटर्डे (Holy Saturday)
होली सॅटर्डे हा येशू ख्रिस्ताचे शरीर क्रूसावरून उतरवून कबरीकडे नेण्याचा आहे. या दिवसाला ‘हॅरोइंग ऑफ हेल’ असं सुद्धा म्हटलं जातं. येशू ख्रिस्ताने देह ठेवल्यानंतर भक्त त्याच्या येशूच्या पुनरुत्थानाची मोठ्या अपेक्षेने वाट पाहत होते आणि त्याच दिवसाच्या स्मरणार्थ आज देखील अनेक चर्चमध्ये शनिवारी सूर्यास्तानंतर ईस्टर व्हिजिल हा विशेष विधी आयोजित केला जातो. यामध्ये प्रार्थना, पवित्र शास्त्र वाचन आणि पास्काल मेणबत्ती प्रज्वलित करण्यासारख्या विधींचा समावेश असतो.
ईस्टर संडे (Easter Sunday)
ईस्टर संडे हा ख्रिस्ती धर्मातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. या दिवशी येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले अशी भाविकांमध्ये मान्यता आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळाली होती. गुड फ्रायडेनंतर तिसऱ्या दिवशी ईस्टर साजरा केला जातो आणि याच दिवसाने ऐश वेनस्डेपासून झालेल्या पॅशन ऑफ ख्रिस्त पर्वाची सांगता होते. ईस्टर संडेला कुटुंबे एकत्र येतात, विशेष प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात आणि आनंदोत्सव साजरा केला जातो. ईस्टर अंडं हे नवीन जीवन आणि पुनर्जन्माचे प्रतीक म्हणून जगभर वापरलं जातं.
Reference: Bible Verses on Death and Resurrection; four Gospels (Matthew, Mark, Luke, and John)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.