Goa BJP: पल्लवी धेंपे यांना चर्च संस्थेचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता!

Goa BJP: पल्लवी यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण गोव्यातील मतदारांना निश्‍चित नवा चेहरा खासदार म्हणून पाहणे आवडेल
Pallavi Dhempe
Pallavi DhempeDainik Gomantak

Goa BJP:

पल्लवी यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण गोव्यातील मतदारांना निश्‍चित नवा चेहरा खासदार म्हणून पाहणे आवडेल. दक्षिणेतील ख्रिश्‍चन समुदायातही धेंपे कुटुंबाविषयी आदर आहे. पणजीतील फेस्तामध्ये धेंपे कुटुंबाचा सक्रिय सहभाग असतो.

त्यामुळे पल्लवी धेंपे यांचे नाव पुढे आल्यास चर्च संस्थाही कोणताच विपरित निर्णय घेणार नाही. स्वतः धेंपे कुटुंबाने किंवा श्रीनिवास धेंपे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली नाही. राज्यसभा खासदारपद धेंपे कुटुंबाकडे जाणार होते; परंतु ऐनवेळी पक्षाने निर्णय बदलला. त्यातूनच उतराई व्हावे म्हणून भाजप पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देणार असल्याची चिन्हे दिसतात.

Pallavi Dhempe
Goa Garbage Issue: कचरा व्यवस्थापन संचालकपदी अंकित यादव

या बाजूही उमेदवारीसाठी बळकटी देतात...

विश्‍व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पल्लवी धेंपे यांचे नाव पुढे गेले आहे. विहिंपशी धेंपे कुटुंबाचे सुरवातीपासून संबंध आहेत. परिषदेच्या ‘मातृछाया’ या संस्थेच्या जडणघडणीत धेंपे कुटुंबाचा मोठा हातभार लागला.

केवळ विहिंपच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही या कुटुंबाची जवळीक आहे. श्रीराम मंदिराला श्रीनिवास धेंपे यांनी एक कोटीची मदत केली आहे. विहिंपने श्रीराम प्रतिष्ठापना दिनाला त्यांना खास सपत्नीक निमंत्रित केले होते.

Pallavi Dhempe
Holi 2024: ‘गोवन’ उद्योगात यंदा 500 किलो रंगनिर्मिती
  • दक्षिण गोव्यातील अनेक कुटुंबे धेंपो उद्योग समूहात नोकरीसाठी आहेत. या उद्योगसमूहात काम करणारा कोणताही कर्मचारी या कुटुंबाविषयी व उद्योगाविषयी कधीच वाईट बोललेला नाही.

  • खाण क्षेत्रातही या कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. खाणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धेंपे कुटुंबाने दिलेली आपुलकीची वागणूक ही एक त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

  • मनोहर पर्रीकर व त्यांच्या कुटुंबाशी श्रीनिवास धेंपे यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. राजकारणात येण्याची संधी असतानाही हे कुटुंब त्यापासून दूर राहिले. या कुटुंबातील महिलेला पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करण्याची संधी चालून आली आहे.

  • श्रीनिवास धेंपे यांचे चुलत आजोबा वैकुंठराव धेंपे यांनी पेडण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती आणि ते पराभूत झाले होते, तर दुसऱ्या बाजूला पल्लवी या मडगावातील तिंबलो घराण्यातील. या घराण्यातील मधु तिंबलो यांनीही मडगावमधून राजकीय नशीब अजमावले होते. मात्र, तेही पराभूत झाले होते.

  • सध्याच्या पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे या पल्लवी धेंपे यांच्या चुलत बहीण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com