Goa Garbage Issue: कचरा व्यवस्थापन संचालकपदी अंकित यादव

Goa Garbage Issue: राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अंकित यादव यांची विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याच्या संचालकपदी नियुक्ती केली.
Goa Garbage Issue
Goa Garbage IssueDainik Gomantak

Goa Garbage Issue:

राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अंकित यादव यांची विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याच्या संचालकपदी नियुक्ती केली. त्यांच्याकडेच गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा ताबा दिला आहे. या पदावरील डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांची कामगार आयुक्तपदी बदली केली आहे.

बदली झालेले अधिकारी व त्यांच्या बदलीचे ठिकाण : दामोदर मोरजकर (सचिव, कोकणी अकादमी), मेघना शेटगावकर (संचालक, शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद. दिव्यांग सशक्तीकरण खात्याच्या संचालक पदाचा अतिरिक्त ताबा), फ्रान्सिस्व्हा ऑलिवेरा (सचिव, रेरा). राज्य निवडणूक आयोगाचे सचिव वेनान्‍सियो फुर्तादोंकडे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा ताबा देण्यात आला आहे.

Goa Garbage Issue
Goa Tourism: समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकना’ची अट

सरकारने वरिष्ठ श्रेणीतील १४ अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यात मेल्विन वाझ, नीतल आमोणकर, गौरीश शंखवाळकर, अरविंद खुटकर, सगुण वेळीप, महादेव आरोंदेकर, हरीश अडकोणकर, सरिता मराठे, फ्रान्सिस्व्हा ऑलिवेरा, परेश फळदेसाई, सुधीर केरकर, शंकर गावकर आणि त्रिवेणी वेळीप यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com