Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

Damu Naik Cemetery Inspection: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांनी शुक्रवारी पाजीफोंड, मडगाव येथील कब्रस्तानाची पाहणी करून मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
Damu Naik Cemetery Inspection
Pajifond Cemetery IssueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांनी शुक्रवारी पाजीफोंड, मडगाव येथील कब्रस्तानाची पाहणी करून मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांच्यावर टीका केली.

काही मुस्लिम बांधवांसह नाईक यांनी कब्रस्तानाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. कब्रस्तानाभोवती संरक्षक भिंत व कुंपण उभारण्याबरोबरच परिसराची स्वच्छता करण्याची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Damu Naik Cemetery Inspection
Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

सरदेसाई १५ वर्षे आमदार असूनही कब्रस्तानाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. काही काळ ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी हा प्रश्न सोडवणे शक्य होते. मात्र, आश्वासन देण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही, अशी टीका नाईक यांनी केली.

उर्फान मुल्ला यांनी हे सुन्नी मुस्लिमांचे कब्रस्तान असल्याचे सांगितले. कब्रस्तानासाठी जागा अपुरी असून कुंपण व भिंत नसल्याने गुरे व कुत्री तेथे येतात. तसेच झाडी वाढल्याने दफनविधीच्या वेळी अडचणी येतात. सुधारणा करण्याची मागणी करूनही काम झाले नसल्याने नाईक यांना पाहणीसाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले.

Damu Naik Cemetery Inspection
Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com