गोव्याचे पर्यावरण आणि समृद्ध संस्कृती धोक्यात

राजकीय पक्ष लोकांच्या इच्छेविरुद्ध आणि हिताच्या विरोधात गेले तर त्यांना हाकलून देण्याचा अधिकार लोकांनाच आहे
P. Chidambaram

P. Chidambaram

Dainik Gomantak

Published on
Updated on

म्हापसा: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे (Congress) गोवा निरीक्षक पी. चिदंबरम यांनी मंगळवारी सांगितले की गोव्याचे पर्यावरण आणि समृद्ध संस्कृती धोक्यात आहे, ज्याचा सामना करून पर्यावरण आणि संस्कृती राखण्याची आवश्यकता आहे. असे म्हापसा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात चिदंबरम (P. Chidambaram) बोलत होते.

यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, जीपीसीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख आदी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>P. Chidambaram</p></div>
Goa Election: गोव्यात भाजप हॅट्ट्रिकसह विजय नोंदवणार, भाजप सरचिटणीसांचा दावा

मुरगाव शेड्युल्ड ट्राइब असोसिएशन, आमी गोयकर, द कोंकणी तियात्रिस्ट अँड रायटर्स असोसिएशन, हेरिटेज ग्रुप, ममोपा संघर्ष समिती, नॅशनल फिशरमेन्स फोरम, सेल्फ हेल्प ग्रुप, युनायटेड गोवन्स आणि गोंयचो कुळ-मुंडकरांचो आवाज या संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना, भाजपने एनजीओंच्या कामकाजावर मर्यादा आणून त्यांच्यावर अन्याय केला असे चिदंबरम म्हणाले.

गृह मंत्रालयाने पात्रता अटींची पूर्तता केली नसल्याच्या कारणास्तव मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) कायद्याच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज नाकारला आहे. लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या अनेक एनजीओंना या मुळे फटका बसला आहे. राजकीय पक्ष लोकांची इच्छा व्यक्त करतात, परंतु राजकीय पक्ष लोकांच्या इच्छेविरुद्ध आणि हिताच्या विरोधात गेले तर त्यांना हाकलून देण्याचा अधिकार लोकांनाच आहे." असे चिदंबरम म्हणाले.

“गोव्यातील विविध मतदारसंघातील लोकांना भेटत असताना त्यांनी मला सांगितले की गोव्याची अद्वितीय आणि समृद्ध संस्कृती, पर्यावरण आणि गोव्याचा इतिहास धोक्यात आला आहे. हे खरे असेल, तर गोव्याच्या कल्याणासाठी सर्वांनाच काम करावे लागेल. राजकीय पक्षांकडे सत्ता आहे हा चुकीचा समज आहे. सुदैवाने सत्ता लोकांकडे आहे आणि ते त्यांना हवे तसे बदल घडवून आणू शकतात. गोव्याची वेगळी ओळख आणि लोकशाहीला कोण नुकसान करत आहे, याचे उत्तर गोव्यातील जनतेने द्यायला हवे. उत्तर सापडले तर त्या धमक्या खोडून काढण्यासाठी बोला, लिहा आणि कृती करा.’’ असा मंत्र त्यांनी दिला.

<div class="paragraphs"><p>P. Chidambaram</p></div>
'रेजिनाल्ड यांनी पक्ष सोडला हे चांगलंच झालं'

काँग्रेस गोव्याचा आवाज बनेल आणि समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असेल, असे ते म्हणाले. "मी तुम्हा सर्वांना वचन देतो, आम्ही सरकार स्थापन करू, काँग्रेसचे नेते तुमच्याकडे परत येतील आणि सरकार चालवण्यासाठी सल्लामसलत करतील. भाजपवर टिका करताना चोडणकर म्हणाले की, भाजप सरकारने गोव्यातील लोकशाहीची हत्या केली आहे आणि आता एनजीओच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करत आहे अ‍ॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा यांनी संवादाचे सूत्रसंचालन केले आणि कॅप्टन विरिएटो फर्नांडिस यांनी स्वयंसेवी संस्था आणि उपस्थित असलेल्यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com