Goa Election: गोव्यात भाजप हॅट्ट्रिकसह विजय नोंदवणार, भाजप सरचिटणीसांचा दावा

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) भाजप हॅट्ट्रिक करणार, असा दावा भारतीय जनता पक्षाचे ( BJP) राष्ट्रीय सरचिटणीस आणि गोव्याचे पक्ष प्रभारी सीटी रवी (C. T. Ravi) यांनी मंगळवारी केला आहे.
C. T. Ravi

C. T. Ravi

Dainik Gomantak 

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोव्याचाही समावेश आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष आपली मोट बांधत आहेत. गोव्यात पहिल्यांदाच आलेल्या तृणमुल कॉंग्रेसने (Trinamool Congress) महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाबरोबर युती करत आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपने (BJP) मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रचार सभा आपल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहेत.

दरम्यान, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) भाजप हॅट्ट्रिक करणार, असा दावा भारतीय जनता पक्षाचे ( BJP) राष्ट्रीय सरचिटणीस आणि गोव्याचे पक्ष प्रभारी सीटी रवी (C. T. Ravi) यांनी मंगळवारी केला आहे. 'गोव्यात भाजप नक्कीच हॅट्ट्रिक जिंकेल. आगामी निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्तेत येईल आणि जिंकेल, असेही सर्व सर्वेक्षणातून दिसून येत आहे. सामाजिक सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास या मुद्द्यांवर आम्ही गोव्यात निवडणूक लढवू आणि पुन्हा एकदा सत्तेत येऊ, असा विश्वास देखील यावेळी गोव्याचे भाजप प्रभारी सीटी रवी यांनी व्यक्त केला आहे.

भाजप नेते रवी पुढे म्हणाले, “आम्ही 40 जागा लढवू आणि सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न करु. आमचे केडर यावर काम करत असून त्यांचे नेटवर्क चांगले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या समावेशाच्या जोरावर आपण 100 टक्के विजयाचे लक्ष्य गाठू शकतो.''

दरम्यान, आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) गोवा विधानसभेच्या अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "त्यांच्याकडे जमिनीवर काहीही नाही. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि AAP फक्त पोस्टर्समध्ये दिसत आहेत. परंतु वास्तवात ते काहीही करत नाहीत. गोव्यात आम आदमी पक्ष अस्तित्व काय आहे? हा नेताहीन पक्ष आहे, मतदारहीन पक्ष आहे. ते कसे जिंकू शकतात? भाजप हा केडर आधारित पक्ष असून आमचेही मतदार आहेत. आम्ही ते केले असून काम करत आहोत, त्यामुळे आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. विरोधी पक्षात कोण येईल माहीत नाही, पण भाजप सत्तेत येईल आणि मला याची 100 टक्के खात्री आहे.

गोव्यातील जनता टीएमसीचे बंगाल मॉडेल स्वीकारणार नाही

त्यांनी पुढे टीएमसीवर निशाणा साधत गोव्यातील जनता पश्चिम बंगाल मॉडेल स्वीकारणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रवी पुढे म्हणाले, 'टीएमसी मॉडेल आता गोव्यात पोहोचले असून मला वाटते की, पश्चिम बंगाल मॉडेल गोव्यातील लोक स्वीकारणार नाहीत. त्यांचे अराजक मॉडेल, भ्रष्ट मॉडेल आहे. सुसंस्कृत नागरिक हे कधीच स्वीकारणार नाही.

'गोव्यात कायदा व सुव्यवस्था राखली'

रवी पुढे म्हणाले,''आम्ही गोव्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे. गेल्या 50 वर्षात जेवढा विकास झाला त्यापेक्षा गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे जास्त झाली आहेत. आणि आम्ही त्याच जोरावरच निवडणूक जिंकू. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखाली 'आत्मनिर्भर भारत'चा मुद्दा घेऊन आम्ही कायदा व सुव्यवस्था राज्यात प्रस्तापित केली. तत्पूर्वी मनोहर पर्रीकर यांच्या काळात गोवा यशोशिखरावर होता. विकासाचे चांगले मॉडेल ठेवून त्यांनी चांगले काम केले आहे.'' गोव्याच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होऊ शकते. 40 जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com