'रेजिनाल्ड यांनी पक्ष सोडला हे चांगलंच झालं'

पी. चिदंबरम यांनी म्हापशातील कार्यक्रमात रेजिनाल्ज यांच्यावर साधला निशाणा
Congress Leader P Chidambaram in Goa

Congress Leader P Chidambaram in Goa

Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : कुडतरीचे आमदार अलेक्सिओ रेजिनाल्ड यांच्यावर पी. चिदंबरम यांनी शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे. काँग्रेसने रेजिनाल्ड यांना तिकीट देऊ केलं होतं, कारण ते विद्यमान आमदार होते. मात्र त्यांनी पक्ष सोडला हे चांगलंच झालं असा टोलाही चिदंबरम (P Chidambaram) यांनी लगावला.

<div class="paragraphs"><p>Congress Leader P Chidambaram in Goa</p></div>
मडगावचा सुनियोजित विकास हा कधी झालाच नाही...

काँग्रेस आपला जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार करणार आहे. या जाहीरनाम्यात एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या सूचनांचा विचार करण्यात आला आहे, असे पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी स्पष्ट केले आहे. म्हापशातील नागरिकांशी पी. चिदंबरम यांनी संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसचा (Congress) अजेंडा स्पष्ट केला.

<div class="paragraphs"><p>Congress Leader P Chidambaram in Goa</p></div>
गडकरींनी दाखवला गोव्याच्या विकासाचा रोडमॅप

काँग्रेस लवकरच आपल्या जागांचा फॉर्म्युलाही जाहीर करणार आहे. ज्यात गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत किती जागांचं वाटप करायचं याचा निर्णय केला जाईल, असंही चिदंबरम म्हणाले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) काँग्रेस पक्षानेही मोर्चेबांधणी केली असून आपला प्रचार सुरु केला आहे. इतर पक्षांप्रमाणेच काँग्रेसचे दिग्गज नेतेही गोव्यात डेरेदाखल होत गोमंतकीयांना साद घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. याचाच एक भाग म्हणून म्हापसा शहरामध्ये काँग्रेस नेत्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com