गडकरींनी दाखवला गोव्याच्या विकासाचा रोडमॅप

झुआरी पुलाचे काम 6 महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याची घोषणा
Nitin Gadkari

Nitin Gadkari

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी : झुआरी पुलाचे काम पुढील 6 महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे पणजीतून वास्को आणि मडगाव असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची झाल्याने वाहनचालक त्रस्त झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे गडकरींच्या घोषणेमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
गोवा जागतिक दर्जाचे प्रदूषणमुक्त राज्य व्हावे

गोव्यातील विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून तब्बल 804.24 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच साडेतीन हजार कोटींच्या 8 नव्या प्रकल्पांनाही केंद्राने मान्यता दिली आहे, असं नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) स्पष्ट केलं आहे. गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यात सत्ताधारी भाजपनेही आता केंद्राच्या मदतीने राज्यातील विकासकामं पूर्ण करण्यासाठी दंड थोपटले आहेत. सध्या गोव्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) आधीच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्यामुळे निदान या योजनांच्या माध्यमातून गोमंतकीय जनतेला खूष करण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) चालला आहे.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
झुआरी नदीवरील नवीन पुलाचे काम जोरात सुरू

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही डिसेंबर महिन्यात गोव्यात दाखल होत गोमंतकीयांना विविध आश्वासनं दिली होती. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केंद्राच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाचा रोडमॅपच समोर ठेवला आहे. यासोबतच गडकरींनी गोवा (Goa) विमानतळ ते वेर्णा हा मार्ग सिग्नलमुक्त करणार असल्याचीही घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com