Omkar Elephant: 'ओंकार'ला महाराष्ट्रात पाठवणे हाच पर्याय, अधिवास दोडामार्गात; धोरण ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारकडे

Omkar Elephant Update: महाराष्ट्र–गोवा दरम्यान सतत वावरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला गोव्यात आल्यावर पुन्हा महाराष्ट्रात परतवणे हाच एकमेव पर्याय वन खात्याकडे असल्याची माहिती उपवनसंरक्षक जीस वर्की यांनी दिली.
Omkar Elephant Update
Omkar Elephant UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्र–गोवा दरम्यान सतत वावरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला गोव्यात आल्यावर पुन्हा महाराष्ट्रात परतवणे हाच एकमेव पर्याय वन खात्याकडे असल्याची माहिती उपवनसंरक्षक जीस वर्की यांनी सोमवारी दिली.

‘ओंकार’चा अधिवास महाराष्ट्रातील दोडामार्ग परिसरात असल्याने त्याच्याबाबत धोरण ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारकडे आहे. त्यामुळे तो गोव्यात आल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात, म्हणजेच महाराष्ट्रात परतवणे भाग पडते, असे वर्की यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाल्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात परतल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, तो पुन्हा गोव्यात आल्यास त्याला परतवण्यासाठी सुमारे ५० कर्मचाऱ्यांचे पथक मोपा व भागात कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, ‘ओंकार’मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे, असे उपविभागीय वन अधिकारी विश्वनाथ पिंगुळकर यांनी सांगितले.

Omkar Elephant Update
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

हत्तीचा महाराष्ट्र-गोवा प्रवास सुरूच

कळपापासून दुरावलेला ‘ओंकार’ हत्ती काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग आणि गोवा असा सतत प्रवास करीत आहे. गोव्यात आल्यानंतर तो पेडणे तालुक्यातील मोपा, तांबोसे व परिसरात ठाण मांडतो. या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून गावांमध्येही प्रवेश केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Omkar Elephant Update
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

काही महिन्यांपूर्वी गोव्यातून दोडामार्गात गेलेला ‘ओंकार’ दोन दिवसांपूर्वी पुन्हा गोव्यात दाखल झाला होता. सोमवारी तो पुन्हा महाराष्ट्रात परतल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी तो वारंवार गोव्यात येत असल्याने महाराष्ट्र सरकार ठोस निर्णय घेईपर्यंत हा प्रश्न कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com