NEET Exam: 15 मिनिटे आधीच परीक्षा हॉलमधून बाहेर काढले? पेडण्यातील 'त्या' धक्कादायक घटनेने गोव्यात खळबळ; 'नीट' प्रशासनावर प्रश्नचिन्ह

NEET Exam Confusion: ‘नीट’ परीक्षेत योग्‍य समन्‍वयाअभावी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. या संदर्भात काही पालकांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.
NEET Exam
NEET Exam ConfusionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘नीट’ परीक्षेत योग्‍य समन्‍वयाअभावी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. या संदर्भात काही पालकांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. २० विद्यार्थ्यांना १५ मिनिटे अगोदरच परीक्षा हॉलमधून बाहेर काढल्याची घटना पेडण्यात घडल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे मीडिया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

पालकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, उमेदवारांना दिलेल्या अ‍ॅडमिट कार्डवर ‘एनआयटी कुंकळ्ळी’ हे परीक्षा केंद्र म्हणून नमूद केले होते. मात्र, नंतर काही विद्यार्थ्यांना एमएमएसद्वारे जो संदेश मिळाला, ज्यामध्ये एनआयटी फोंडा-फर्मागुडी हे परीक्षा केंद्र असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा नेमकी कुठे आहे, याबाबत विद्यार्थी व पालकांत संभ्रम निर्माण झाला.

NEET Exam
NEET Exam: गोव्यात 12 केंद्रांवर 'नीट'साठी कडक देखरेख; सर्व यंत्रणा सज्ज, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

त्यामुळे काही पालक फोंड्याला पोहोचले, तेथे परीक्षा होत नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी कुंकळ्ळी एनआयटी गाठली. या गोंधळाबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेसाठी अशी परस्परविरोधी माहिती कशी दिली जाऊ शकते? अत्यंत महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर असताना या गोंधळामुळे त्यांच्यावर आणखी अनावश्यक ताण निर्माण झाला होता.

यापूर्वी नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे एनटीएने ही परीक्षा पुन्हा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्या परीक्षेची सर्व जबाबदारी त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही नेणे आणि आणण्याची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्याकडे सोपविली होती. तर केंद्रांवरील सुरक्षा ही स्थानिक पोलिसांच्या हाती होती.

NEET Exam
NEET Paper Leak: 'नीट' पेपरफुटीप्रकरणी आंदोलन, भाजप कार्यालयावर मोर्चा; गोवा काँग्रेस पक्षाकडून जोरदार टीका

वीस विद्यार्थ्यांवर अन्याय?

२० विद्यार्थ्यांना १५ मिनिटे अगोदरच परीक्षा हॉलमधून बाहेर काढल्याची घटना पेडण्यात घडल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे मीडिया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले, की पेडणे येथील ‘हॉल एजी-७’ मधील २० नीट परीक्षार्थींना कथितरित्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधीच बाहेर काढले, पण इतरांना पूर्णवेळ दिला. ज्या स्पर्धा परीक्षेत प्रत्येक गुणाला महत्त्व असते, तिथे हा शैक्षणिक अन्याय का? या विद्यार्थ्यांची ती १५ मिनिटे कोणी हिरावून घेतली, असा सवाल त्यांनी केला आहे.

कुजिरा येथे रोझरी, मुष्टिफंड, केंद्रीय विद्यालय आणि धेंपो माध्यमिक विद्यालय अशी चार परीक्षा केंद्रे होती. प्रत्येक केंद्रावर उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस शिपाई तैनात केले होते. उत्तर गोव्यात १८० पोलिस कर्मचारी या बंदोबस्तासाठी होते.

- हरिश्चंद्र मडकईकर, जिल्हा पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com