मुख्‍यमंत्री, दामू दिल्लीत; निवडणूक, मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत वरिष्‍ठांसोबत करणार चर्चा

Pramod Sawant Delhi Visit: भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीन नबीन यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक शनिवारी दिल्लीला पोहोचले.
Pramod Sawant Delhi Visit
Pramod Sawant Delhi VisitDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नितीन नबीन यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक शनिवारी दिल्लीला पोहोचले. रविवारी ते नबीन यांच्‍यासह इतर वरिष्‍ठ नेत्‍यांशी आगामी विधानसभा निवडणूक तसेच मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत चर्चा करणार असल्‍याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

मुख्‍यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष शनिवारी दिल्लीला रवाना झाल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. परंतु नंतर याचा उलगडा झाला. नबीन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्‍छा देण्‍यासाठी ते दिल्लीला गेले असून, रविवारी ते विधानसभा निवडणूक, पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत नबीन यांच्‍यासह इतर नेत्‍यांसोबत चर्चा करणार आहेत.

Pramod Sawant Delhi Visit
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पक्ष संघटनेला देणार बळकटी

राज्‍य विधानसभा निवडणूक अवघ्‍या दहा महिन्‍यांवर येऊन ठेपली आहे. प्रदेश भाजपने गेल्‍या काही वर्षांपासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आता अंतिम टप्‍प्‍यात पक्ष संघटनेला अधिकाधिक बळकटी देण्‍यासाठी राबवण्‍यात येणाऱ्या उपक्रमांबाबत वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळेल?

विधानसभा निवडणुकीत ५० टक्‍के नवे चेहरे देण्‍यात येणार असल्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी आधीच जाहीर केले आहे. त्‍याबाबतही बैठकीत चर्चा होईल. शिवाय, मंत्रिमंडळातील रिक्त जागी महिला आमदाराला संधी द्यावी का, याबाबतही विचारविनिमय होणार असल्‍याचेही सूत्रांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com