Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Objectionable Video Viral Threat Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून कौटुंबिक नात्यांना आणि विश्वासाला काळिमा फासणारी एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली.
Objectionable Video Viral Threat Kanpur
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Kanpur Chakeri Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून कौटुंबिक नात्यांना आणि विश्वासाला काळिमा फासणारी एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली. येथील चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेने स्वतःच्या सख्ख्या मावशी आणि मामावर अत्यंत गंभीर आरोप केले, ज्यामुळे कौटुंबिक नात्यांच्या मर्यादांवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले.

मावशी आणि मामाने कौटुंबिक संबंधांचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन सुरुवातीला तिला गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवून तिला दीर्घकाळ ब्लॅकमेल केल्याचा आरोप या पीडितेने केला. इतकेच नव्हे तर, या फोटोंच्या जोरावर तिला जबरदस्तीने चुकीच्या कामांत ढकलले गेले आणि तिचे मोठे आर्थिक शोषणही करण्यात आले.

Objectionable Video Viral Threat Kanpur
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 89 बळी, आस्मानी संकटाचा कहर! VIDEO

पीडित महिलेने (Women) पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, हा संपूर्ण प्रकार 2014 पासून सुरु झाला. तिच्या मावशी आणि मामाने अत्यंत पद्धतशीरपणे कट रचून तिला गुंगीचे पदार्थ खायला घातले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. यानंतर तिच्या आयुष्यात छळाचे सत्र सुरु झाले. विरोध केल्यास तिला मारहाण, शिवीगाळ आणि प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता. या अश्लील क्लिप्सचा वापर करुन तिला ब्लॅकमेल करत तिच्या इच्छेविरुद्ध देहव्यापार सारख्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून तिने लग्न केले, परंतु लग्नानंतरही या नराधमांनी तिचा पिच्छा सोडला नाही आणि पैशांची मागणी सुरुच ठेवली.

Objectionable Video Viral Threat Kanpur
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी महिलेवर दबाव आणण्यासाठी एका कथित तांत्रिकाचीही मदत घेतली आणि तिला विविध प्रकारे घाबरवून चुकीची कामे करण्यास भाग पाडले. अखेरच्या टप्प्यात तर पीडितेच्या अवघ्या आठ महिन्यांच्या निष्पाप बाळाला जिवे मारण्याची किंवा नुकसान पोहोचवण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. गेल्या 20 महिन्यांत आरोपींनी तिच्याकडून सुमारे दीड लाख रुपये वसूल केले, ज्यामध्ये अलीकडेच घेतलेल्या एक लाखाचाही समावेश आहे.

Objectionable Video Viral Threat Kanpur
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

जेव्हा पीडितेने आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या सततच्या धमक्या आणि असह्य मानसिक त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली. या संवेदनशील प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सखोल तपास सुरु केला असून तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे दोन्ही आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com