Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा बंड, अजित पवार राजभवनवर पोहोचले; शपथ घेणार?

NCP Ajit Pawar new Deputy CM of Maharashtra: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार राजभवनात पोहोचले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarDainik Gomantak
Published on
Updated on

NCP Ajit Pawar new Deputy CM of Maharashtra: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार राजभवनात पोहोचले आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी अजित पवार यांच्या मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या.

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी संघटना सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनात पोहोचले आहेत.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक आमदारांनाही शिंदे मंत्रिमंडळात मंत्री केले जाऊ शकते. अजित पवार राजभवनात पोहोचले असून, ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. रविवारी अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थक आमदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर 17 आमदारांसह राजभवनाकडे रवाना झाले.

एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे काही मंत्रीही राजभवनात पोहोचले आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिलीप पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोदा, मकरंद पाटील, अनुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

अजित पवार का नाराज आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी न मिळाल्याने अजित पवार नाराज होते. या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. मात्र सुप्रिया बैठकीतून निघून गेल्या होत्या.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात उपस्थित असलेल्या शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. राजकीय उलथापालथ पाहता शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

तसेच, अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत शरद पवार म्हणाले होते की, मला याबाबत माहिती नाही. मात्र विरोधी पक्षनेते असल्याने ते आमदारांची बैठक बोलवू शकतात. हे ते नियमितपणे करतात. पण मला या भेटीबद्दल फारशी माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com