Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: सीएमपदाची शपथ घेताच फडणवीसांचे नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठ्ठ वक्तव्य, म्हणाले...
Nagpur Goa Shaktipeeth ExpresswayDainik Gomantak

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: सीएमपदाची शपथ घेताच फडणवीसांचे नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठ्ठ वक्तव्य, म्हणाले...

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: सांगलीपर्यंत महामार्गाला समर्थन असून, विरोध नसलेल्या भागापर्यंत महामार्ग करण्यात येईल, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway

मुंबई: नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना एकनाथ शिंंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने रद्द केल्यानंतर, नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच या महामार्गाबाबत मोठ्ठ वक्तव्य केलं आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत चर्चेतून मार्ग काढू असे म्हणत, विरोध नसलेल्या भागापर्यंत महामार्ग पूर्ण करणार असल्याचे महायुतीचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच, मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

या शपथ सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या केंद्रीय मंत्री, दिग्गज कलाकार, उद्योगपतींनी हजेरी लावली होती. शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीसांनी मंत्रालयात पहिली पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: सीएमपदाची शपथ घेताच फडणवीसांचे नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठ्ठ वक्तव्य, म्हणाले...
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध, नागपूर- गोवा महामार्गाबाबत शिंदे सरकारनं घेतला मोठा निर्णय

यावेळी शक्तीपीठ महामार्गाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गावर चर्चेतून मार्ग काढणार असल्याचे सांगितले. तसेच, सांगलीपर्यंत महामार्गाला समर्थन असून, विरोध नसलेल्या भागापर्यंत महामार्ग करण्यात येईल, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या महामार्गाला कोल्हापूरातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता एकनाथ शिंदेंच्या सरकार महामार्ग भूसंपादन अधिसूचना रद्द केली होती.

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: सीएमपदाची शपथ घेताच फडणवीसांचे नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठ्ठ वक्तव्य, म्हणाले...
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: '...अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही'; शेतकऱ्यांचा एल्गार

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत पुन्हा एकदा सकारात्मक भाष्य केले आहे. यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या या महामार्गाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, महामार्गाच्या विरोधात असणारे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची देखील शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com