Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: '...अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही'; शेतकऱ्यांचा एल्गार

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध वाढतच चालला आहे.
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: '...अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही'; शेतकऱ्यांचा एल्गार
Nagpur-Goa Shaktipeeth ExpresswayDainik Gomantak
Published on
Updated on

नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध वाढतच चालला आहे. यातच आता या महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी संघटित झाले आहेत. नागपूर-गोवा महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन यावा. अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, अशी तंबी शेतकऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने करण्यात येतील, असे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सांगितले. नागपूर-गोवा महामार्ग रद्द केल्याशिवाय कोणत्याही मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा समितीने दिला.

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: '...अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही'; शेतकऱ्यांचा एल्गार
Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरात हजारो शेतकरी एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय धडक मोर्चा

नागपूर आणि गोवा महामार्गाला सर्वाधिक विरोध कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकरी करतायेत. या दोन्ही जिल्ह्यासह एकूण 11 जिल्ह्यातून हा महामार्ग गेला आहे. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध वाढत असून, महामार्गात जमिनी जाणाऱ्या कागल तालुक्यातील शेतकरी एकवटले आहेत. शेतकऱ्यांनी महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरु केला आहे. नव्या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जुने मार्ग असताना नवा मार्ग कशासाठी असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

mission for local protest warning
Monsoon Foot Care
Medical Negligence Goa
 Dr Yavanti Gaonkar Suspension News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com