मुंबई: नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेता महामार्गाच्या संरेखनात बदल करण्याचा निर्णय MSRDC ने घेतला आहे. पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव देखील मागे घेण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकरी या महामार्गाला कडाडून विरोध करत आहेत.
धार्मिक पर्यटनाच्या उद्देशाने प्रस्तावित असलेला नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. कोल्हापूर आणि सांगलीतील ११ जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामर्गाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर जिरायती आणि बागायती जमीन प्रभावित होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी महामार्गच रद्द करण्याची मागणी केलीय. शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या अंतर्गत दोन्ही जिल्ह्यातील बाधित शेतकरी एकवटले आहेत.
शक्तीपीठ महामार्गाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदार देखील विरोध करत आहेत.
शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने महामार्गाच्या संरेखनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यासाठीचा पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव देखील मागे घेण्यात आला आहे.
८०५ किमी लांबीचा हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून गोव्यात जातो. महामार्गावर येणारी शक्तीपीठं हे याचं वैशिष्ट्य असून, पर्यटनाच्या उद्देशाने त्याचा विकास केला जात आहे.
नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गावरुन नागपूर ते गोवा प्रवास आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.
दरम्यान, सांगली कोल्हापूरातून या महामार्गाला मोठा विरोध होत आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीन महामार्गात जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.