Mulgaon Mining: 50 वर्षांपासून धुळीत जगतायत मुळगांवकर; "रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणारच नाही का?" सरकारला संतप्त सवाल

Goa Mining Issue: धूळ झाली असली तरी त्या धुळीसोबत पैसा पण येतो असे मुख्यमंत्री म्हणाले होते
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

मुळगाव: बेतुल येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण विषयावर एक विवादास्पद वक्तव्य केले. गावातील लोकं खाण व्यवसायाला उगीच विरोध करीत आहे. खाणीमुळे धूळ प्रदूषण होते हे कारण देऊन त्यांचा विरोध चालू आहे, पण आज खाणींमुळे धूळ झाली असली तरी त्या धुळीसोबत पैसा पण येतो असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर मुळगांव गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीये. ते म्हणालेत की गेल्या ५० वर्षांपासून मुळगावची लोकं या दुळीसह जगतायत. सरकारने जरी याची भरपाई म्हणून पैसे देण्याचं आश्वासन दिलं तरीही मुळगांवातील नेमक्या किती लोकांपर्यंत हे पैसे पोहोचलेत याची खरोखर माहिती गोळा करावी लागेल.

CM Pramod Sawant
Goa Mining: 12 पैकी 9 खाणपट्ट्यांत प्रत्यक्षात खाणकाम सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर CM सावंतांची मोठी घोषणा

कारण धुळीमुळे येणारा पैसा हा सरकारी तिजोरीत येतो खरा पण तोच पैसा खाण अवलंबितांकडे पोचत नाही. खाणींमुळे निर्माण होणारी धूळ दररोज घरात पसरते, घरातील भांडी, वस्तू धुळीमुळे खराब होतात.

स्थानिकांना या धुळीचा प्रचंड त्रास होतोय, लोकं आजारी पडतायत. टीबीसारखे जीवघेणे आजार लोकांना ग्रासतायत. त्यामुळे सरकारने किंवा एनजीओच्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन इथली माहिती घ्यावी. किती लोकं आजरी आहेत, कोणाला किती आणि कसा त्रास होतोय हे पाहिलं पाहिजे. या धुळीमुळे किती लोकांना त्रास झाला हे सरकारने येऊन पहावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिवाय सरकार स्थानिकांना शेती-बागायतीवर लक्ष केंद्रित करायला सांगतोय, मात्र स्थानिकांच्या मतानुसार सुरु असलेल्या खाणींमुळे जनावरं खाली गावांमध्ये येतात आणि शेतीची नासाडी करतात अशा परिस्थितीत आम्ही रस्त्यावर येईपर्यंत सरकार काहीच ठोस पाऊल उचलणार नाही का? असा प्रश्न मुळगांववासीयांनी विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com