Goa Mining: 12 पैकी 9 खाणपट्ट्यांत प्रत्यक्षात खाणकाम सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर CM सावंतांची मोठी घोषणा

CM Sawant Mining Announcement: यंदा १२ पैकी ९ खाणपट्ट्यांत प्रत्यक्षात खाणकाम सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथे केली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : यंदा १२ पैकी ९ खाणपट्ट्यांत प्रत्यक्षात खाणकाम सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथे केली. केंद्रीय खाणकाममंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खाण खात्याच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

दोनापावल येथे बैठकीत कार्यरत नसलेल्या खाणींना पुनरुज्जीवित करण्याच्या आणि नवीन खाण संधींचा शोध घेण्याच्या रणनीतींवर चर्चा झाली. खाण कार्यपद्धती पुन्हा सुरू झाल्याने गोव्याच्या सकल राज्य उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी खाण क्षेत्र पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या चर्चेच्या केंद्रस्थानी संभाव्य खाणपट्ट्यांच्या लिलावाच्या योजना, लिलाव झालेल्या खाणी कार्यान्वित करण्याची सद्यस्थिती आणि सुरू असलेले अन्वेषण प्रकल्प होते. विशेष म्हणजे, दोन ते तीन खाणपट्टे अजूनही पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या प्रलंबित असल्यामुळे अडथळ्यात अडकले आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी या प्रक्रियेला गती देण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.

CM Pramod Sawant
Goa Illegal Constructions: अनधिकृत बांधकामांबाबत तडजाेड नाही, कठोर कारवाईसाठी कोर्टाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

गोव्यातील प्रत्येक खाणपट्ट्याबाबत फलदायी चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे गोवा सरकार पालन करत आहे. पुढील सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू होईल. पर्यावरण, महसूल आणि रोजगार यासारख्या सर्व पैलूंवर विचार केला जाईल, असे रेड्डी यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

बैठकीत खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, संभाव्य बोलीदार, सार्वजनिक उपक्रम, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, खनिज अन्वेषण महामंडळ आणि पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते.

यामध्ये शाश्वत आणि जबाबदारीने खनन कसे करावे, खनिज अन्वेषणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि गोव्यातील पर्यावरण संतुलन राखण्याच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या उद्योगांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळीच्या सुरक्षिततेवर भर दिला आहे. सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत त्यांचा पुरवठा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: कोल्हापुरातून 1 तासांत मोपाला जाता येईल; CM फडणवीसांनी सांगितलं शक्तिपीठ का गरजेचा आहे

रोजगार संधीचा योग्य विचार

या बैठकीनंतर रेड्डी यांनी आज जाहीर केले की, पुढील सहा महिन्यांत गोव्यात लोहखनिज खाणकाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यांनी आश्वासन दिले की, गोवा सरकार खाणकामासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत असल्यामुळे पर्यावरणविषयक चिंता, महसूल निर्मिती आणि रोजगाराच्या संधी यांचा योग्य विचार केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com