Morjim News : मांद्रे देवी सातेरी, परिवार पंचायतनचा आज वर्धापनदिन

हा कार्यक्रम मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी पुरस्कृत केला आहे.
Mandrem Devi Sateri
Mandrem Devi SateriDainik Gomantak
Published on
Updated on

Morjim : मराठवाडा मांद्रे येथील श्री देवी सातेरी व परिवार पंचायतन देवस्थानचा 22 वा वर्धापनदिन अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर शनिवार, 22 रोजी साजरा करण्यात येणार असून या निमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, 21 रोजी सकाळी श्री देव पाटेश्वर चरणी धार्मिक विधी, कौल, ब्राम्हण भोजन व सायंकाळी 7 वा. ‘झी मराठी सारेगम’ फेम प्रसन्न प्रभुतेंडोलकर व साथी कलाकारांचा ‘स्वरानुभूती’ कार्यक्रम होईल. यात शुभम परब, गीतगंधा गाड, शुभम नाईक, संकेत खलप, शैलेश शिरोडकर या कलाकारांचा समावेश असून निवेदन सोनाली परब करणार आहेत. हा कार्यक्रम मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी पुरस्कृत केला आहे.

Mandrem Devi Sateri
Morjim Crime : विदेशी महिलेचा विनयभंग; खुनाचा प्रयत्न

22 (अक्षय तृतीया) रोजी सकाळी ज्ञानेश्वर पार्सेकर यांच्या यजमानपदाखाली विविध धार्मिक विधी, दुपारी 12 वा. देवतांचा कौल, आरत्या, तीर्थप्रसाद, आशीर्वाद व महाप्रसाद व सायंकाळी ठीक 6 वा. सुवासिनींचा आरती ओवाळण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 7.30 वा. श्री सातेरी नाट्य मंडळ, मराठवाडा-मांद्रे निर्मित, नानासाहेब शिरगोपीकर लिखित व सोमनाथ पार्सेकर दिग्दर्शित चार अंकी संगीत नाटक ‘भाव तोची देव’ सादर होणार आहे.

Mandrem Devi Sateri
Morjim: विमानतळ, कार्निव्हल करता पण पाणी देता येत नाही? 2 महिन्यांपासून पाणी नसल्याने महिला संतापल्या

यात पराग पार्सेकर, दादू पार्सेकर, शैलेश पार्सेकर, सनिल पार्सेकर, अभिजित पार्सेकर, संतोष पार्सेकर, मितेश पार्सेकर, संकेत पार्सेकर, प्रज्ञा पार्सेकर, स्नेहल कारखनीस व बालकलाकार - हृषिकेश, सुयश, दिगंबर, वेदांत, तनिश, कार्तिक, उत्कर्ष, सौम्या, साईज्ञा, सिया, सार्थिका, साची, गुंजन व गार्गी यांच्या भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com