Morjim कुणाच्या म्हशी अन् कोण काढतो उठाबशी !

ध्वनिप्रदूषण केले नसताना कारवाई : आश्वे, मांद्रे शॅक्स व्यावसायिकांची व्यथा
Shacks Bussiness
Shacks BussinessGomantak Digital Team
Published on
Updated on

Morjim : मांद्रे मतदार संघातील आश्वे, मांद्रे किनारी भागात पर्यटन हंगामात उभारलेल्या खासगी जागेतील शॅक्स, रेस्टॉरंट, रिसॉर्टवर सरकारने कारवाई केली आहे. जे ध्वनी प्रदूषण करतात त्यांच्यावर कारवाई केल्यास कुणाची हरकत नाही. परंतु ज्यांनी ध्वनी प्रदूषण केलेच नाही. त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा ‘ना हरकत दाखला’ न घेतल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली आहे.

परिणामी अनेकांचे उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची अवस्था ‘कुणाच्या म्हशी, अन् कोण काढतो उठाबशी’ या म्हणी बरहुकूम झाली आहे. सविस्तर माहितीनुसार आश्वे येथील ओकियो या रिसॉर्ट मध्ये नोव्हेंबर २०२२ पासून ध्वनी प्रदूषणकारी संगीत रजनीचे आयोजन केले जायचे.आश्वे व मांद्रे कासव संवर्धन मोहिमेमुळे संवेदनशील घोषित केले होते. असे असतानाही ‘ओकियो’सह इतर काही रिसॉर्ट मध्ये ध्वनी प्रदूषण केले जात होते. परिणामी ‘ओकियो’वर बंदी घातली होती.

Shacks Bussiness
Honey Garlic Benefits: रोज रिकाम्या पोटी मध अन् लसूणचे करा सेवन; अनेक आजार होतील दूर

हॉटेल्स त्वरित खुली करा!

आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता आमची हॉटेल्स किचन सील केले आहे. आम्हाला आता पर्यटन हंगाम संपल्यानंतर आमचं सामान व्यवस्थित नीट नीट ठेवायचे आहे. हे सामान ठेवण्यासाठी सरकारने आणि आमदार जीत आरोलकर यांनी प्रयत्न करून टाळे ठोकलेल्या परिसरात आम्हाला आमचे सामान व्यवस्थित मांडून ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी कारवाई झालेल्या व्यावसायिकांनी केलेली आहे.

Shacks Bussiness
CM Pramod Sawant : समृद्ध गोमंतकीय संस्कृतीचे विदेशींना दर्शन; महत्त्वाची बाब !

‘प्रदूषण’चा दाखला नाही !

काही व्यावसायिकांनी याचिका सादर करून जे रिसॉर्ट ध्वनी प्रदूषण करतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही,अशी विचारणा केली. त्यानंतर ३३ रिसॉर्टवर सरकारने कारवाई केली. पण ‘प्रदूषण नियंत्रण ’चा ना हरकत दाखला नसल्याचा ठपका संबंधितांवर ठेवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com