Mopa Training Centre: मोपा प्रशिक्षण केंद्र बंद करणार नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्‍यमंत्री : मागणीनुसार तेथे सुरू करणार विविध अभ्‍यासक्रम
Mopa Training Centre: CM Pramod Sawant
Mopa Training Centre: CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Training Centre: मोपा येथे सुरू केलेले हवाई कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र बंद केले जाणार नाही. तेथे मागणीनुसार विविध अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

Mopa Training Centre: CM Pramod Sawant
गेल्‍या 5 वर्षांत विविध कार्यक्रमांवर सरकारकडून 500 कोटींचा चुराडा

आर्लेकर म्हणाले की, या प्रशिक्षण केंद्रावर किती जणांना प्रशिक्षण दिले आणि प्रत्यक्षात किती जणांना नोकऱ्या दिल्या? ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत त्यांचे भवितव्य काय? सध्या कोणते अभ्यासक्रम या केंद्रावर राबवले जात आहेत? तर, आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, करारानुसार एका अभ्यासक्रमासाठी किमान १५ व कमाल ७५ विद्यार्थी असले पाहिजेत.

अभ्यासक्रमासाठी १५ पेक्षा कमी विद्यार्थी मिळाल्‍यास हे प्रशिक्षण केंद्र सरकार बंद करणार का? प्रशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यास कोणी पुढे येणार नाही.

त्यामुळे हा विषय कसा हाताळणार? आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले की, १ हजार ३२ जणांना प्रशिक्षण देण्‍यात आलेय. त्यापैकी मोपा विमानतळावर ९९१ जणांना नोकऱ्या मिळाल्या.

आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात मोप विमानतळावर १ हजार ३०० जणांना नोकऱ्या मिळाल्याचा उल्लेख आहे. मग प्रशिक्षण न देताच काही जणांना नोकऱ्या दिल्या का? दरम्‍यान, आमदार जीत आरोलकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून शुल्क आकारणी होत असल्‍याकडे लक्ष वेधले.

Mopa Training Centre: CM Pramod Sawant
Tigers in Goa Forests: गोव्‍याच्‍या जंगलांत वाघांचे अस्‍तित्‍व; विश्‍‍वजीत राणे

आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी या संस्थेचे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यासाठी काय प्रयत्न आहेत? असा सवाल केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रमाणपत्र विदेशात चालते का याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.

गोव्याबाहेरील प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीच शुल्क

सदर प्रशिक्षण केंद्रावरील अभ्यासक्रमात मागणीनुसार बदल केले जाणार असल्याने ते बंद करणार नाही, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोव्याबाहेर प्रशिक्षण असलेल्या अभ्यासक्रमांसाठीच शुल्क आकारले जाते. इतर अभ्यासक्रमांसाठी शुल्क आकारले जात नाही. तरीही शुल्क आकारणी होत असल्यास सरकारच्या नजरेस ती बाब आणावी.

९० टक्के प्रशिक्षणार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. इतरांचे प्रस्ताव स्वीकारलेले नाहीत. काही जागा या इतर ठिकाणच्‍या प्रशिक्षित उमेदवारांकडून भरण्यात आल्या आहेत. या संस्थेचे प्रमाणपत्र राष्ट्रीय पातळीवर वैध असल्याने मोपा विमानतळावर नोकरी मिळाली नाही तरी इतर ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी ते उपयोगी ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com