Mopa Taxi Counter: "जीतभाई धन्यवाद !" आरोलकरांचा शाल-श्रीफळाने सत्कार; अखेर मोपा विमानतळावरील टॅक्सी काउंटर सुरू

Mopa Taxi Service: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पुढाकार घेऊन काउंटर पुन्हा सुरु करून दिल्याबद्दल स्थानिक व्यावसायिकांनी आरोलकर यांचे आभार मानत गौरव केला
Pernem News
Pernem NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावरील गोवा पर्यटन विकास महामंडळचा टॅक्सी काउंटर १ एप्रिल पासून बंद होता. पेडणे तसेच मांद्रे मतदारसंघातील अनेक टॅक्सी चालक या काउंटरवर अवलंबून असल्याने त्यांनी लवकरात लवकर हा काउंटर सुरु करावा अशी मागणी केली होती आणि आता मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पुढाकार घेऊन तो काउंटर पुन्हा सुरु करून दिल्याबद्दल स्थानिक व्यावसायिकांनी आमदार आरोलकर यांचे आभार मानत गौरव केला.

आरोलकरांचा शाल-श्रीफळाने सत्कार

स्थानिक टॅक्सी चालकांनी दलेल्या माहितीनुसार, अनेक तरुण देखील मोपा विमानतळावरील या टॅक्सीच्या व्यवसायात सामील आहेत, त्यामुळे हा काउंटर बंद असणं हे एकतार्थाने त्यांच्या दैनंदिनीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याप्रमाणे होतं. पेडणे वासियांनी याबद्दल पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याजवळ देखील काउंटर सुरु करण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्याकडून म्हणावी तशी मदत मिळाली नसल्याचं टॅक्सी चालकांनी सांगितलं.

मुख्यमंत्री-पर्यटनमंत्री देखील कौतुकास पात्र

मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी पेडणे वासियांकडून करण्यात आलेल्या बहुमानाचा स्वीकार केला, मात्र यावर बोलताना हे माझं कर्तव्य असल्याचं देखील म्हणाले. पेडणे तसेच मांद्रे मतदारसंघातील अनेक लोकं या व्यवसायावर पोट भरतात आणि त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन हा काउंटर पुन्हा सुरु करण्यात आलाय.

आमदार आरोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मांद्रे आणि पेडणे मतदारसंघाच्या लोकांनी एकत्र त्यांची भेट घेतली आणि व्यथा मांडली. यानंतर केलेल्या तपासणीत टॅक्सी काउंटरचा करार कालबाह्य झाला असल्याची माहिती मिळाली.

Pernem News
Dabolim Airport Taxi Counter: दाबोळी विमानतळावर स्थानिक टॅक्सीचलाकांना डावलले; दिल्ली-बिहारमधून आणले 120 चालक

यानंतर मुख्यमंत्र्यांची ताबडतोब भेट घेऊन त्यांच्या कानी एकूण प्रकार घातल्याचं आरोलकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती समजून घेत हा काउंटर लवकरात-लवकर सुरु करण्यासाठी आवश्यक आदेश जारी केले. याचप्रमाणे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी देखील वेळ न घेता आवश्यक फाईल्स पडताळून मुख्यमंत्र्यांकडून कागदी प्रक्रिया पूर्ण करवून घेत काउंटर पुन्हा सुरु केला.

या काउंटरवर अनेक घरं चालतात, कित्येक इएमआय आणि लोन फेडण्यासाठी टॅक्सी चालकांजवळ असलेला हा एकमेव पर्याय असल्याने काउंटर सुरु केल्याचं आरोलकर म्हणाले तसंच मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रक्रिया सोपी झाल्याचं म्हणत त्यांनी दोघांचे आभार देखील मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com