Pramod Sawant: 'पुढील 10 वर्षात केरळ, तमिळनाडूतही असेल भाजपची सत्ता'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास

Goa BJP Politics: वाजपेयी आणि एल. के. अडवाणी यांनी सुरु केलेल्या कामाची फळं आता मिळायला लागली आहेत; मुख्यमंत्री सावंत.
BJP will form government in Kerala and Tamil Nadu in next 10 years
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'पुढील दहा वर्षात केरळ आणि तमिळनाडू राज्यात भाजपची सत्ता येईल', असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी (०८ एप्रिल) आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी सावंत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्य आणि योगदानावर भाष्य केले.

भाजपने पणजीत 'अटल स्मृती' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. "स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जगाला भारत देखील महाशक्ती असल्याचे दाखवून दिले. त्यांनी अणुचाचणी केली. भारतात देखील अणु चाचणी करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले", असे मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

BJP will form government in Kerala and Tamil Nadu in next 10 years
Suchana Seth: पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या CEO सूचनाचा आणखी एक प्रताप; जेलमध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण

"पंतप्रधान पदाच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात अटल बिहारी वाजपेयी यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याच काळात त्यांनी मोबाईल कनेक्टिव्हिटी संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला. देशात झालेल्या मोबाईल क्रांतीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. देशाच्या प्रत्येक भागात त्यांनी ही संकल्पना पोहोचवली", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"केवळ एका मताने सत्ता गमावून देखील देशात एकवेळ भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी देखील अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. भाजपची देशात पुढील २५ वर्षे सत्ता असेल, असा विश्वासही त्यांनीच व्यक्त केला होता. वाजपेयी दूरदर्शी नेते होते, त्यांचा संघटनेच्या शक्तीवर विश्वास होता"प, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

BJP will form government in Kerala and Tamil Nadu in next 10 years
Sindhudurg: काजू गोळा करायला गेला अन् हत्तीनं पायाखाली चिरडलं; सिंधुदुर्गात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

केरळ आणि तमिळनाडू या राज्यात भाजपची सत्ता नसेल पण पुढील दहा वर्षात या राज्यात देखील भाजपची सत्ता येईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. वाजपेयी आणि एल. के. अडवाणी यांनी सुरु केलेल्या कामाची फळं आता मिळायला लागली आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com