Goa St. Francis Xaviers Feast: ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च परिसरात होणाऱ्या St. Francis Xaviers Feast च्या पार्श्वभुमीवर येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
ही फीस्ट 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात होणार आहे. या काळात सेंट फ्रान्सिस झेवियर यांची प्रार्थना करण्यासाठी जगभरातून हजारो लोक ओल्ड गोव्यात येतात. त्यांचे अवशेष या चर्चमध्ये जतन केले गेले आहेत.
गोवा पोलीस आणि राज्यातील इतर सुरक्षा एजन्सीजमार्फत या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. हा सेंट फ्रान्सिस झेवियर्सचा उत्सव ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च परिसरात साजरा होतो.
बुधवारी ही मॉक ड्रिल पार पडली. पोलिसांनी दोन डमी दहशतवाद्यांना पकडले आणि बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चजवळ दोन्ही डमी बॉम्ब निष्फळ केले.
मॉक एक्सरसाइजचा एक भाग म्हणून पर्यटक आणि भाविकांसह सुमारे 800 लोकांना कोणतीही भीती न बाळगता सात मिनिटांत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कवायत 22 मिनिटांत संपली, असे पोलिसांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.