Michael Lobo Acquitted: 'सीझेडएमए'चे बनावट पत्र प्रकरण; आमदार मायकल लोबो दोषमुक्त, पुराव्याअभावी सुटका

Michael Lobo Acquitted: या प्रकरणातील संशयित मायकल लोबो तसेच फ्रान्सिस व्हिएगस ऊर्फ फ्रँकी यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Michael Lobo Acquitted
Michael Lobo AcquittedDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचे बनावट पत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या खटल्यात म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

या प्रकरणातील संशयित मायकल लोबो तसेच फ्रान्सिस व्हिएगस ऊर्फ फ्रँकी यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण २००६ मधील एका कथित पत्राशी संबंधित होते, ज्यामध्ये कळंगुट येथील एका जमिनीबाबत ‘जीसीझेडएमए’चे बनावट पत्र तयार करून नगररचना विभाग आणि ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

Michael Lobo Acquitted
Goa Bench: मडगावातील दुहेरी खून प्रकरणी; जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

मात्र, सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष कथित मूळ (ओरिजनल) बनावट पत्र न्यायालयात सादर करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. याशिवाय, फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेल्या संगणक हार्ड डिस्कच्या अहवालाबाबत आवश्यक असणारे इलेक्ट्रॉनिक पुरावा प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले नाही, ज्यामुळे या संगणकीय विश्लेषणाला कायदेशीर मूल्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

तपासादरम्यान घेतलेले विविध पंचनामे आणि साक्षीदारांच्या जबानीत मोठ्या प्रमाणात परस्परविरोधी दावे दिसून आले आहेत. संशयितांनी हे पत्र वापरून कोणाची फसवणूक केली अथवा कोणाचे आर्थिक किंवा मालमत्तेचे नुकसान केले, याचा कोणताही थेट पुरावा न्यायालयात आलेला नाही.

Michael Lobo Acquitted
Goa Court Cases Pending: राज्‍यात 272 खटले 30 वर्षांपासून प्रलंबित; कनिष्‍ठ न्‍यायालयांतील 63,560 खटल्‍यांचा अजूनही निकाल नाही

तसेच मुख्य दस्तऐवज बनावट असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे कलम ४७१ (बनावट दस्तऐवज वापरणे) अंतर्गत लावलेला आरोपही टिकू शकत नाही, असे सांगत न्यायालयाने पोलिस तपास पूर्वग्रहदूषित आणि केवळ एकाच दृष्टिकोनातून करण्यात आल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

दोन संशयित आधीच दोषमुक्त

या प्रकरणात आधीच अन्य दोन संशयित डॉ. नरैना वर्दे आणि विल्फ्रेड जुआव यांना न्यायालयाने दोषमुक्त केले होते. आता उर्वरित दोन संशयितांविरोधातील कोणतेही गुन्हे सिद्ध न झाल्याने न्यायाधीशांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये मायकल लोबो आणि फ्रान्सिस व्हिएगस यांची भादंवि कलम ४६८, ४७१, ४२०, २०१ आणि ३४ या सर्व आरोपांतून सुटका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Salman Khan Goa project news
Drunk Driving
Saligao Waste Plant
Michael Lobo Nazri Resort Demolition
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com