...त्यामुळे कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षांची सभा पोलिसांनी केली बंद

कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांची रुमडामळ दवर्ली येथे आयोजित सभा पोलिसांनी (Goa Police) निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी घेतली नाही असे कारण पुढे करून बंद केली.
Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election 2022: कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांची रुमडामळ दवर्ली येथे आयोजित सभा पोलिसांनी (Goa Police) निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी घेतली नाही असे कारण पुढे करून बंद केली. ही सभा सुरू झाल्यावर मायणा कुडतरी पोलिस निरीक्षक सागर एकोसकर यांनी व्यासपीठाचा कब्जा घेत ध्वनिक्षेपक काढून घेतला. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.

Goa Election 2022
नाट्यगायक रामदास कामत निवर्तले

वास्तविक या सभेला यापूर्वी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, आजपासून गोवा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) आचारसंहिता (Social Code of Conduct) लागू झाली आहे. त्यामुळे पूर्वीची परवानगी अवैध ठरते असा पोलिसांनी दावा केला. मात्र, जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली सभा बंद कशी करता येते असा सवाल स्वतः इम्रान प्रतापगढी यांनी केला.

Goa Election 2022
Corona Crisis: मडगाव जिल्हा रुग्णालय बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल

प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी या घटनेचा निषेध करताना पोलिसांची ही हडेलहप्पी असा आरोप केला. काल आम्हाला राज्यपालांना भेटण्यापासून अडविले. आज आमची सभा बंद पाडली यावरून भाजपच्या (BJP) पायाखालची वाळू सरकली आहे याची जाणीव झाल्याने ते आम्हाला घाबरू लागले आहेत हे स्पष्ट होत आहे, असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com